लाईनमनला मारहाण; पाच जणांवर अॅट्रॉसिटी
By Admin | Updated: June 18, 2016 01:00 IST2016-06-18T00:34:39+5:302016-06-18T01:00:13+5:30
तलवाडा : गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे लाईनमनला घरात घुसून मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली. तलवाडा ठाण्यात गुरुवारी पाच जणांवर अॅट्रॉसिटी अॅक्टअन्वये गुन्हा नोंद झाला.

लाईनमनला मारहाण; पाच जणांवर अॅट्रॉसिटी
तलवाडा : गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे लाईनमनला घरात घुसून मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली. तलवाडा ठाण्यात गुरुवारी पाच जणांवर अॅट्रॉसिटी अॅक्टअन्वये गुन्हा नोंद झाला.
रामेश्वर नानासाहेब दोडके (रा. निपाणी जवळका ह.मु. तलवाडा) असे मारहाण झालेल्या लाईनमनचे नाव आहे. ते नुकतेच बदलीने तलवाडा येथील ३३ केव्ही उपकेंद्रात आले आहेत. दरम्यान, त्यांच्यापूर्वी तलवाड्यात रामकिसन मोटे हे लाईनमन म्हणून काम करत. मध्यरात्री जीप क्र. (एमएच ०५- ३०४९) मधून रामकिसन मोटे हे अन्य चौघांसमवेत घरी आले. ‘तुझ्यामुळे माझी बदली झाली’ असे म्हणत त्यांनी मारहाण करुन धमकावले. शिवाय शिवीगाळ केली. दोडके यांची दुचाकी (क्र. एमएच २३ ई-२०१६) ची तोडफोड करुन नुकसान केले. दोडके यांच्या फिर्यादीवरुन रामकिसन मोटेसह शुभम मोटे, स्वप्नील मोटे, बाळासाहेब उर्फ बाळू मोटे, मयूर दानवे (सर्व रा. गेवराई) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला. तपास उपअधीक्षक राजकुमार चाफेकर करत आहेत. (वार्ताहर)