भरदिवसा महिलेची पर्स पळविली
By Admin | Updated: November 18, 2015 00:39 IST2015-11-18T00:29:33+5:302015-11-18T00:39:01+5:30
लातूर : शहरातील गंजगोलाई परिसरात गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी फळ खरेदी करणाऱ्या महिलेच्या हातातील पर्स हिसकावत दिवसाढवळ््या लुटल्याची घटना सोमवारी घडली.

भरदिवसा महिलेची पर्स पळविली
लातूर : शहरातील गंजगोलाई परिसरात गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी फळ खरेदी करणाऱ्या महिलेच्या हातातील पर्स हिसकावत दिवसाढवळ््या लुटल्याची घटना सोमवारी घडली. पर्समध्ये ठेवलेला २० हजारांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला असून, या प्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे महिलांमध्ये खळबळ उडाली आहे.
शहरातील शासकीय कॉलनीत राहणाऱ्या धनश्री अशोक शिंदे या सोमवारी दुपारी गंजगोलाईत खरेदीनिमित्त गेल्या होत्या. यावेळी त्या भुसार लाईन परिसरात एका फळाच्या गाडयावर सफरचंद खरेदी करत असताना, हातात असलेल्या पर्सवर लक्ष ठेवत अज्ञात चोरट्याने ही पर्सच हिसकावत धूम ठोकली. महिलेला दिवसाढवळ््या लुटल्याची घटना घडल्यानंतर बाजारपेठेत एकच खळबळ उडाली. पर्समध्ये ठेवण्यात आलेला मोबाईल आणि रोख ७९० रुपये असा एकूण २० हजार १९० रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला आहे. या प्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यात धनश्री शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कलम ३०९ भादंविप्रमाणे चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.