लाडझरीत घरफोडी; सिरसाळ्यात दुकानात चोरी
By Admin | Updated: May 18, 2015 00:23 IST2015-05-17T23:59:53+5:302015-05-18T00:23:40+5:30
सिरसाळा / मांडवा : परळी तालुक्यातील लाडझरी व सिरसाळा येथे शनिवारी रात्रीचोरांनी धुमाकूळ घातला. लाडझरीत घर फोडले तर सिरसाळ्यात किराणा दुकानात हात साफ केला.

लाडझरीत घरफोडी; सिरसाळ्यात दुकानात चोरी
सिरसाळा / मांडवा : परळी तालुक्यातील लाडझरी व सिरसाळा येथे शनिवारी रात्रीचोरांनी धुमाकूळ घातला. लाडझरीत घर फोडले तर सिरसाळ्यात किराणा दुकानात हात साफ केला.
लाडझरी येथील धोंडीराम राजेंद्र पुरी हे आपल्या कुटुंबियासमवेत घराच्या छतावर झोपले होते. उकाडा असल्यामुळे दरवाजा बंद करून छतावर जाणे पसंत केले होते. रात्री चोरांनी दरवाजा तोडून कपाटातील दागिने, रोख रक्कम असा एकूण पावणेदोन लाख रूपयांचा ऐवज लांबविला. याप्रकरणी पुरी यांनी ग्रामीण ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेने लाडझरी परिसरात खळबळ उडाली आहे.
दुसऱ्या घटनेत सिरसाळा येथे मारूती मंदिराच्या मागील बाजूस असलेले रामराव कराड यांचे किराणा दुकान फोडून २३ हजार रूपयांचा माल चोरांनी लांबविला. रोख रक्कम व किराणा माल घेऊन चोर पसार झाले. शटरचे कुलूप तोडून चोरांनी दुकानात प्रवेश केला.
या प्रकरणी कराड यांनी सिरसाळा ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. चोरांच्या बंदोबस्ताची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)