टाकी ओव्हरफ्लो होऊन लाखो लिटर पाणी वाया

By Admin | Updated: August 10, 2014 02:20 IST2014-08-10T02:08:34+5:302014-08-10T02:20:36+5:30

उमरगा : शहराला पाणीपुरवठाक रणारी पाण्याची टाकी ओव्हरफ्लो होऊन लाखो लिटर पाणी वाया गेले. दरम्यान, पाऊस नसतानाही मध्यरात्रीच्या

Lack of millions of liters of water by the tank overflow | टाकी ओव्हरफ्लो होऊन लाखो लिटर पाणी वाया

टाकी ओव्हरफ्लो होऊन लाखो लिटर पाणी वाया




उमरगा : शहराला पाणीपुरवठाक रणारी पाण्याची टाकी ओव्हरफ्लो होऊन लाखो लिटर पाणी वाया गेले. दरम्यान, पाऊस नसतानाही मध्यरात्रीच्या सुमारास अचानक घरात पाणी शिरल्याने नागरिकांची अक्षरश: झोप उडाली. शहरातील कार्ले प्लॉट भागातील साई मंदिर परिसरात शुक्रवारी रात्री एक ते पहाटे साडेपाच या कालावधीत हा प्रकार घडला.
याबाबत माहिती अशी की, शहरातील विविध प्रभागाला पाणीपुरवठा करण्यासाठी येथील अंतुबळी सांस्कृतिक सभागृह, मलंग प्लॉट, महात्मा बसवेश्वर विद्यालय, हमीद नगर या भागात जलकुंभ उभारण्यात आले आहेत. येथील अंतुबळी सांस्कृतिक सभागृहाजवळ उभारलेल्या जलकुंभामार्फत साईनगर मंदिर परिसरातील कार्ले प्लॉट, औटी प्लॉट या भागात पाणीपुरवठा केला जातो. या सर्वच जलकुंभांना माकणी धरणातील समुद्राळ येथील जलशुध्दीकरण केंद्रामार्फत थेट जलवाहिनी टाकण्यात आली आहे. हे जलकुंभ टप्प्याटप्प्याने भरले जातात.
शुक्रवारी रात्री येथील अंतुबळी सांस्कृतिक सभागृहाशेजारील पाण्याची टाकी भरणे सुरू होते. रात्री एक वाजल्यानंतर टाकी पूर्ण भरून ती ओव्हरफ्लो झाली. यामुळे हे पाणी कालॅ प्लॉट भागात शिरले. पाऊस नसतानाही अचानक रस्त्यावरून पाणी वाहू लागले. याशिवाय या भागातील रहिवाशी महादेव माने, दयानंद बिराजदार, अप्सर डांगे यांच्या घरात पाणी घुसले. विठ्ठल कलमले यांच्या घरापुढे वाहून आलेल्या पाण्यामुळे तळे साचल्याचेही दिसून आले. रस्त्यावरून वाहत असलेले पाणी आपल्या घरात शिरू नये यासाठी प्रत्येकजण पाणी अडविण्याचा प्रयत्न करीत होते. तर काही गृहिणी घरात शिरलेले पाणी बाहेर काढत असल्याचे शनिवारी सकाळी दिसून आले. (वार्ताहर)

Web Title: Lack of millions of liters of water by the tank overflow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.