लाखो पतंगांची आकाशी झेप

By Admin | Updated: January 15, 2016 23:56 IST2016-01-15T23:51:01+5:302016-01-15T23:56:20+5:30

औरंगाबाद : मकरसंक्रांतीच्या पहाटेपासूनच शहरात पतंगबाजीला सुरुवात झाली होती. लाखो पतंगांनी आकाश व्यापून टाकले होते.

Lack of kite flying celestial | लाखो पतंगांची आकाशी झेप

लाखो पतंगांची आकाशी झेप

औरंगाबाद : मकरसंक्रांतीच्या पहाटेपासूनच शहरात पतंगबाजीला सुरुवात झाली होती. लाखो पतंगांनी आकाश व्यापून टाकले होते. ‘चल खिच... खिच... ए ढिल दे रे... कांटे, कांटे...’ असे आवाज ऐकू येत होते. अनेकांनी गच्चीवर डीजे लावले होते. ‘शांताबाई’च्या गाण्यावर आबालवृद्ध पतंगबाजी करीत होते. मागील आठवडाभरात शहरात तब्बल २० लाख पतंग विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. यावरून पतंगशौकिनांचा उत्साह किती होता, हे लक्षात येते.
संक्रांत आणि तीळगुळाचे नाते जितके घट्ट आहे, तितकेच घट्ट नाते संक्रांत आणि पतंगाचे आहे. लहानापासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण पतंग उडविण्याचा आनंद या दिवशी घेत असतो. औरंगाबादेत दिवसभरात लाखो पतंग उडाले व कटलेही; पण पतंगबाजीचा खरा उत्साह जुन्या शहरातच होता. खासकरून औरंगपुरा, गुलमंडी, कुंभारवाडा, दलालवाडी, मछली खडक, अंगुरीबाग, धावणी मोहल्ला, खाराकुँआ, रंगारगल्ली, भांडीबाजार, कासारीबाजार, सराफा रोड, शहागंज, राजाबाजार, कँुवारफल्ली, जाधवमंडी, नबाबपुरा, किराणा चावडी, गांधीनगर, बंजारा कॉलनी या भागात लहान-थोर पतंग उडविताना दिसून आले. काही ठिकाणी राजकीय नेत्यांनीही खास पतंगबाजीचे आयोजन केले होते. अनेक कापड व्यापारी एकाच ठिकाणी पतंग उडविण्यासाठी जमले होते. चटपटीत चाट, हुरड्यापासून ते जेवणापर्यंतची व्यवस्था करण्यात आली होती. सिंधी कॉलनीतील मैदानावर पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आबालवृद्ध आनंद लुटताना दिसून आले.

Web Title: Lack of kite flying celestial