विश्रांती कक्षात सुविधांचा अभाव
By Admin | Updated: June 24, 2017 00:16 IST2017-06-24T00:10:30+5:302017-06-24T00:16:21+5:30
देगलूर : देगलूर बसस्थानकात चालक व वाहकांसाठी असलेल्या रेस्ट रूममध्ये दुर्गंधी तर आहेच, त्यासोबत प्रचंड असुविधा आहे. चालक व वाहकांना बसण्यासाठी सतरंजी सुद्ध नाही.

विश्रांती कक्षात सुविधांचा अभाव
लोकमत न्यूज नेटवर्क
देगलूर : देगलूर बसस्थानकात चालक व वाहकांसाठी असलेल्या रेस्ट रूममध्ये दुर्गंधी तर आहेच, त्यासोबत प्रचंड असुविधा आहे. चालक व वाहकांना बसण्यासाठी सतरंजी सुद्ध नाही.
देगलूर बसस्थानकात चालक व वाहकांच्या रेस्ट रूममध्ये (विश्रांती कक्षात) प्रचंड दुर्गंधी आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या चालक व वाहकांना थोडे आडवे पडण्यासाठी तर सोडाच; बसण्यासाठी सुद्धा सतरंजी नाही. अनेक चालक व वाहक सतरंजी नसल्यामुळेच फरशीवर आडवे पडतात. रेस्ट रूमच्या खिडकीला काचा नाहीत. पाऊस पडला तर पाणी रूममध्ये येते. नावाला का होईना दोन पंखे आहेत पण ते कधी चालू होतात तर कधी चालू होत नाहीत. सध्या तरी ते बंदच आहेत. पंख्याला अनेक महिन्यांपासून वेसा (जाळ्या) आहे़ परंतु ते कुणी साफ करीत नाही. रेस्ट रूममध्ये सुविधा देण्याची मागणी अनेक वेळा चालक व वाहकानी केली. किमान सतरंजी व पिण्यासाठी पाणी तरी उपलब्ध करून देण्याची मागणी करुनही त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्षच करण्यात आले. तीन राज्याच्या सीमेवर असलेल्या या बसस्थानकात चालक व वाहकांना थोडे आडवे पडावे वाटले तर सतरंजीसुध्दा नाही. वास्तविक देगलूर आगार हे कधी काळी उत्पन्नाच्या बाबतीत मराठवाड्यात प्रथम क्रमांक आलेले आगार आहे. या आगारातील चालक व वाहकांच्या विश्रांती कक्षात पलंग, गाद्या, सतरंजी, पंखा, पिण्यासाठी पाणी ह्या अत्यावश्यक बाबी उपलब्ध करून देणे गरजेचे असताना दुर्गंधीयुक्त रुममध्ये साधी सतरंजी नसल्यामुळे चालक व वाहकात प्रचंड नाराजी आहे