मनपा रुग्णालयात डेंग्यूवरील उपचाराचा अभाव

By Admin | Updated: August 7, 2014 02:05 IST2014-08-07T01:03:17+5:302014-08-07T02:05:08+5:30

औरंगाबाद : शहरात डेंग्यू व इतर साथरोगांनी हातपाय पसरले असून, उपचार करण्याची सुविधा नाही

Lack of Dengue treatment at Municipal Hospital | मनपा रुग्णालयात डेंग्यूवरील उपचाराचा अभाव

मनपा रुग्णालयात डेंग्यूवरील उपचाराचा अभाव

औरंगाबाद : शहरात डेंग्यू व इतर साथरोगांनी हातपाय पसरले असून, पालिकेकडे मात्र, डेंग्यूच्या दुसऱ्या व तिसऱ्या प्रकारावर उपचार करण्याची सुविधा नाही. परिणामी सर्वसामान्य रुग्णांना खाजगी हॉस्पिटल्सची सेवा घ्यावी लागत असून, प्रत्येक दिवसाला साडेतीन ते चार हजार रुपयांचा खर्च रुग्णांच्या नातेवाईकांना पेलणे अशक्य होत असल्याचे दिसते आहे. शहरातील लहान-मोठे खाजगी हॉस्पिटल्स सध्या तापाच्या रुग्णांनी हाऊसफुल असल्याचे दिसते आहे.
६२२ तापाचे रुग्ण
६२२ तापेचे रुग्ण आढळून आले आहेत. मनपाने डेंग्यू व साथरोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी २ लाख ५ हजार ६९५ घरांमध्ये अ‍ॅबेट वाटप केले आहे. ४ हजार ६१० ठिकाणी डेंग्यू डासांची अंडी (लारव्हा) आढळून आल्या आहेत. पाच दिवसांपासून कोम्बिंग आॅपरेशन सुरू असून, सिडको-हडको भागात पुन्हा आॅपरेशन सुरू करण्यात आल्याचे आरोग्य अधिकारी डॉ.संध्या टाकळीकर यांनी सांगितले.
मनपाने घेतलेले निर्णय
डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करणे, हँडबिल वाटणे, शाळेत धूरफवारणीसाठी शाळा सुटल्यानंतर फवारणी करणे. त्यासाठी मुख्याध्यापकांनी आरोग्य विभागाकडे नोंदणी करणे, वॉर्ड अधिकाऱ्यांनी टीमला साफसफाईसाठी आदेशित करणे, खाजगी हॉस्पिटल्सने गंभीर रुग्णांची तातडीने माहिती मनपाला देणे.
धातू भांड्यात पाणी साठवा
मातीच्या उदा. माठ, रांजण, हौदात पाणी साठविण्याऐवजी धातूच्या भांड्यात पाणी साठविण्यात यावे.
पिण्याचे पाणी स्टील, पितळ, तांबा यापैकी कोणत्याही धातूच्या भांड्यात साठवावे. कारण अनेक ठिकाणी मातीच्या साधनांमध्ये साठविलेल्या पाण्यात डेंग्यू डासांची अंडी आढळून आली आहे. वापराचे पाणीही झाकून ठेवावे, असे आवाहन डॉ.टाकळीकर यांनी केले आहे.

Web Title: Lack of Dengue treatment at Municipal Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.