२०० अंगणवाड्यांना इमारतींचा अभाव

By Admin | Updated: June 20, 2014 00:13 IST2014-06-20T00:13:34+5:302014-06-20T00:13:34+5:30

सुनील चौरे , हदगाव तालुक्यातील २८२ व नवीन १४ अंगणवाड्यांपैकी फक्त ८८ अंगणवाड्या स्वत:च्या इमारतीत भरतात़ तर २०८ अंगणवाड्यांना इमारतच नाही़

Lack of buildings to 200 anganwadis | २०० अंगणवाड्यांना इमारतींचा अभाव

२०० अंगणवाड्यांना इमारतींचा अभाव

सुनील चौरे , हदगाव
तालुक्यातील २८२ व नवीन १४ अंगणवाड्यांपैकी फक्त ८८ अंगणवाड्या स्वत:च्या इमारतीत भरतात़ तर २०८ अंगणवाड्यांना इमारतच नाही़ आता पावसाळ्यात या अंगणवाड्या बंद असतात़ किंवा मग मोडकळीला आलेल्या जि़ प़ शाळांत, अंगणवाडी ताईच्या घरीच भरविल्या जातात़ ही समस्या ३० वर्षांपासून आहे़
एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे मुलभूत उद्दिष्ट सहा वर्षाखालील बालके, गर्भवती व स्तनदा माता याचे आरोग्य व पोषण स्थिती सुधारण्यासाठी तसेच शालेयपूर्व श्क्षिणास उत्तेजन देण्यासाठी मुलभूत सेवा पुरविणे हे आहे़ या सेवा म्हणजे लसीकरण, पुरक पोषण आहार, आरोग्य तपासणी संदर्भ सेवा, पोषण व आरोग्य श्क्षिण आणि शालेय पूर्व शिक्षण होय़ ही योजना गावपातळीवर राबविली जाते़
यासाठी ५५३ मंजूर बालविकास प्रकल्प असून या बालविकास प्रकल्पासाठी ३६४ ग्रामीण, १०४ नागरी व ८५ आदिवासी क्षेत्रात आहेत़ जिल्हा वार्षिक योजना, बीआरजीएफ, ग्रामीण पायाभूत विकास अंतर्गत अंगणवाडीच्या बांधकामासाठी निधी येत असतो़
इ़स़२००९-१०, २०१०-११, २०११-१२, २०१२-१३ या चार वर्षात ८८ अंगणवाडी इमारतीची कामे सुरू झाली असून त्यापैकी फक्त ७० अंगणवाड्यांची कामे पूर्ण झाली असून १८ अंगणवाड्या अद्याप अपूर्णच आहेत़ या अंगणवाड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्थाच नाही़ २८२ अंगणवाड्यांपैकी एकाही अंगणवाडीत वीजजोडणी नाही़
३० वर्षांपासून अंगणवाड्या मोडकळीस आलेल्या जि़प़शाळा, समाजमंदिर, किंवा अंगणवाडी ताईच्या घरीच भरतात़ तालुक्यात २७८ अंगणवाड्या सध्या सुरू आहेत़ यामध्ये २५ हजार ९७८ विद्यार्थी शालेय पूर्व शिक्षणाची तोंडओळख करून घेतात़ सर्व शिक्षण अभियानांतर्गत अडगळीच्या ठिकाणी वाडी-तांड्यावर शाळेच्या इमारती १० वर्षात शेकडो उभ्या राहिल्यात़ परंतु अंगणवाडीची उपेक्षा संपता संपेना़ चार-पाच वर्षाला प्रत्येक गावात नवीन अंगणवाडीला मान्यता मिळते़ एका सर्कलच्या गावात ५ ते १० अंगणवाड्याची संख्या झाली़ १ हजार लोकसंख्यावरून ५०० लोकसंख्येला एक अंगणवाडी मंजूर झत्तली़ सुरूही झाली़ परंतु स्वत:चे छत मात्र त्यांच्या वाट्याला आले नाही़
ज्या वयात स्वच्छतेचे धडे गिरविले जातात, त्यांना मात्र उकिरड्यावर, उघड्यावर पोषक आहार दिला जातो़ वर्षातील आठ महिने ठीक आहे़ तेवढ्या अडचणी येत नाहीत़ परंतु पावसाळ्यात कुठे बसायचे, अंगणवाडीत कसे गायचे, हा प्रनच आहे़ अनेक गावांत किरायाने खोल्या मिळत नाही़ जिथे मिळतात त्यांना शासन नियमाने अत्यल्प किराया वर्षाला, दोन वर्षाला मिळतो़
इ़स़२००९-१०, २०१०-११, २०११-१२, २०१२-१३ या चार वर्षात ८८ अंगणवाडी इमारतीची कामे सुरू झाली असून त्यापैकी फक्त ७० अंगणवाड्यांची कामे पूर्ण झाली असून १८ अंगणवाड्या अद्याप अपूर्णच आहेत़ या अंगणवाड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्थाच नाही़

Web Title: Lack of buildings to 200 anganwadis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.