मजुरांचे आधार संलग्नीकरणही मंदच
By Admin | Updated: December 16, 2015 23:15 IST2015-12-16T23:05:01+5:302015-12-16T23:15:22+5:30
हिंगोली : विविध योजनांप्रमाणे मग्रारोहयोतील सक्रिय मजुरांच्या आधार संलग्नीकरणाचे कामही मंद गतीनेच होत असल्याची बाब समोर आली आहे.

मजुरांचे आधार संलग्नीकरणही मंदच
हिंगोली : विविध योजनांप्रमाणे मग्रारोहयोतील सक्रिय मजुरांच्या आधार संलग्नीकरणाचे कामही मंद गतीनेच होत असल्याची बाब समोर आली आहे. अजूनही हा आकडा ५४ टक्क्यांच्या पुढे सरकायला तयार नाही.
विविध योजनांमध्ये आधार संलग्नीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे सुरुवातीला आधार संलग्नीकरणाच्या कामाने वेग पकडला होता. मात्र पन्नास टक्क्यांवर नोंदणी आल्यानंतर जणू हे काम ठप्पच झाल्यात जमा आहे. तहसील व पंचायत समित्यांनी याकडे दुर्लक्षच करून टाकले आहे. शिवाय मजूरही कामावर येत नसल्याने यासाठी वेळ द्यायला संबंधित यंत्रणा तयार नसल्याचे चित्र आहे.
हिंगोली जिल्ह्यात औंढा-१३५९२, वसमत-२0४४, हिंगोली-१५९६५, कळमनुरी-७९0४, सेनगाव-१३४१५ अशी एकूण ५२ हजार ८७७ एवढी सक्रिय मजुरांची संख्या आहे. खरेतर हा आकडा त्याहीपुढे होता. मात्र तो नंतर मजुरांची सक्रियता नसल्याने कमी झाला आहे. यापैकी औंढा-६४४१, वसमत-१५४७, हिंगोली-९९३४, कळमनुरी-५00४, सेनगाव-५६६३ अशी एकूण २८५८९ मजुरांचे आधार लिंकिंग झाले आहे. हे काम ५४.0७ टक्के एवढे होते. मागच्या महिन्यात ते ५२.४७ टक्के एवढे होते. मजूर कमी असल्याने वसमतमध्ये ७५.६८ टक्के काम झाले आहे. प्रत्येक तालुक्यात मागील महिन्याच्या तुलनेत एक ते दोन टक्क्यांचीच वाढ झाली आहे.