रोहयोच्या कामावर मजुरांची निदर्शने; मजुरी वाढविण्याची मागणी
By Admin | Updated: May 8, 2017 23:43 IST2017-05-08T23:42:14+5:302017-05-08T23:43:27+5:30
जालना : तालुक्यातील धावेडी येथे शेतमजुरांनी मनरेगाची कामे देण्यात यावीत तसेच इतर प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शने केली.

रोहयोच्या कामावर मजुरांची निदर्शने; मजुरी वाढविण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : तालुक्यातील धावेडी येथे शेतमजुरांनी मनरेगाची कामे देण्यात यावीत तसेच इतर प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शने केली.
कामे देण्यास प्रचंड विलंब झाला आसल्याने मजुरांना कायद्यानुसार बेरोजगार भत्ता वाटप करावा. पंचायत समिती, तहसीलकडे मागणी करूनही येथे कामाची मागणी केली परंतु काम वेळेत मिळाले नाही. कामासाठी सतत संघर्ष करु न सुध्दा मजुरांना तात्काळ कामे मिळत नाहीत मागील सततचा दुष्काळ तर शेतातील पिकलेल्या मालाला सरकार खरीदी करत नाही कापसाला भाव नाही. त्यामुळे शेतकरी तसेच मजूर वर्ग हैराण झाले आहेत.
राज्यातील व केंद्रातील भाजप सरकार मजूर व शेतकरी यांच्या विरोधी काम करीत आहे. नोटा बंदी करु न भाजपने स्वत:ची तिजोरी भरु न घेतल्याचा आरोप यावेळी करण्यातआला. महिना महिना घराबाहेर राहून मोंढ्यात किंवा वखार महामंडळावर आमचा शेतकरी भाऊ शेतमाल विकण्यासाठी रांगेत उभा आहे. हातावर पोट घेउन देशाची सेवा करणा-या गरीब मानसांना न्याय देण्यासाठी लाल झेंडा हातात घेउन सतत संघर्ष करणाऱ्या पुणे येथील कामगार कार्यालयावर बॉम्ब पार्सल पाठवुन लोकशाही मूल्य मारण्याची धमकी काही जातीयवादी करत आहेत. याचा निषेध यावेळी करण्यात आला. यावेळी मारोती खंदारे, सरीता शर्मा, सुर्यकला ठोंबरे, अंकुश गवारे, विठ्ठल गांगुरडे, शिवगंगा खरात, मंगल भांडेकर, सुरेखा धोतरे, संजय पोटे, धोंडीराम गायकवाड, आर्जुन गायकवाड उपस्थित होते.