बोअर घेण्यासाठी आलेल्या मजुराने मुलीला पळविले
By Admin | Updated: April 3, 2017 23:16 IST2017-04-03T23:13:33+5:302017-04-03T23:16:33+5:30
भोकरदन : तालुक्यातील बेलोरा येथे विहिरीमध्ये आडवे बोअर घेण्यासाठी आलेल्या मजुराने विहीर मालकाच्या विवाहित मुलीस फुस लावून पळवून नेले.

बोअर घेण्यासाठी आलेल्या मजुराने मुलीला पळविले
भोकरदन : तालुक्यातील बेलोरा येथे विहिरीमध्ये आडवे बोअर घेण्यासाठी आलेल्या मजुराने विहीर मालकाच्या विवाहित मुलीस फुस लावून पळवून नेले. या प्रकरणी सोमवारी भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
या बाबत भोकरदन पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की आरोपी किशोर श्रीराम महाले (रा शेकापूर तालुका जिल्हा बुलढाणा) याने विवाहित असलेली १८ वर्षांची मुलगी परीक्षा देण्यासाठी माहेरी बेलोरा येथे आली होती.
२८ मार्च रोजी किशोर महाले याने तिला फुस लावून पळवून नेले. मुलीचा २८ फेब्रुवारी रोजी परशी किन्होळा येथील मुलाशी विवाह झाला होता. या विवाहितेला एक महिना झाला.
बारावीची परीक्षा देण्यासाठी ती माहेरी आली होती. २८ मार्च रोजी मुलीला वालसा येथून परीक्षा संपल्यानंतर घरी घेऊन आलो. सायंकाळ नंतर घरात आढळून आली नाही. २ एप्रिल रोजी भोकरदन पोलिस ठाण्यात त्यांनी आरोपी किशोर महाले विरूध्द मुलीला पळवून नेल्याची तक्रार दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. (वार्ताहर)