कौन्सिलमुळे लॅबोरेटरीचे दर राहील देशभर सारखे

By Admin | Updated: April 24, 2016 00:12 IST2016-04-24T00:10:08+5:302016-04-24T00:12:46+5:30

औरंगाबाद : देशात नर्सिंग कौन्सिल आहे, फार्मसी कौन्सिलदेखील आहे.

Laboratory rates will be hiked by the Council | कौन्सिलमुळे लॅबोरेटरीचे दर राहील देशभर सारखे

कौन्सिलमुळे लॅबोरेटरीचे दर राहील देशभर सारखे

औरंगाबाद : देशात नर्सिंग कौन्सिल आहे, फार्मसी कौन्सिलदेखील आहे. त्यामुळे मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या धर्तीवर मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्टस् कौन्सिल आॅफ इंडियाचीही स्थापना झाली पाहिजे. या कौन्सिलच्या स्थापनेनंतरच आम्हाला अवैध म्हणणाऱ्यांना अवैध कोण अन् वैध कोण याचे उत्तर मिळेल. कौन्सिलमुळे देशभरातील लॅबोरेटरीच्या गुणवत्तेवरही नियंत्रण राहील. शिवाय लॅबोरेटरीचे दर सर्वत्र सारखे राहण्यास मदत होईल, असा सूर शनिवारी आॅल इंडिया मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनात निघाला.
आॅल इंडिया मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यगृहात आयोजित केलेल्या दोनदिवसीय ४१ व्या आंतरराष्ट्रीय अधिवेशन व वैज्ञानिक परिसंवादाचे शनिवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते उद््घाटन झाले. याप्रसंगी आ. अतुल सावे, आ. इम्तियाज जलील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, संजय केणेकर, डॉ. हेमलता वानखेडे, राष्ट्रीय अध्यक्ष धनंजयकुमार, सचिव ए. एन. सिन्हा, उपाध्यक्ष बी.के.त्रिपाठी, डॉ. बी.एन. शुक्ला, एस. सी. गुप्ता, संयोजन समितीचे अध्यक्ष आर. डी. लांडगे, सचिव अमोल पाटणी यांची उपस्थिती होती.
एम.डी. पॅथॉलॉजिस्ट यांच्यामार्फत चालविण्यात येणाऱ्या प्रयोगशाळांतील बहुतांश कामे लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट करतात. अनेक ठिकाणी तर पॅथॉलॉजिस्ट केवळ स्वाक्षरी करण्याचेच काम करतात. टेक्नॉलॉजिस्टंस्नाही लॅबचा, स्वाक्षरीचा अधिकार मिळाला तर अधिक गुणवत्ता वाढविली जाईल. शिवाय कौन्सिलच्या स्थापनेनंतर लॅबोरेटरीची नियमित तपासणी होईल, असा सूरही अधिवेशनात निघाला.

Web Title: Laboratory rates will be hiked by the Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.