जालन्यात श्रमिक साहित्य संमेलन
By Admin | Updated: June 27, 2017 00:52 IST2017-06-27T00:50:44+5:302017-06-27T00:52:16+5:30
जालना : शहरात १० व ११ सप्टेंबर रोजी श्रमिक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

जालन्यात श्रमिक साहित्य संमेलन
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरात १० व ११ सप्टेंबर रोजी श्रमिक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाच्या पूर्वतयारीनिमित्त शनिवारी सरस्वती भुवन प्रशालेत बैठक घेण्यात आली. या वेळी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष, संमेलनातील परिसंवाद, चर्चासत्र, कविसंमेलन, ग्रंथदिंडी याबाबत चर्चा करण्यात आली. आयोजक अण्णा सावंत यांनी संमेलनाची भूमिका विषद केली. या वेळी प्रा. बसवराज कोरे, डॉ. रावसाहेब ढवळे, डॉ.विजयकुमार कुमठेकर, राम गायकवाड, किशोर घोरपडे, प्रा. संजय लकडे, प्राचार्या डॉ.सुनंदा तिडके, प्रा.राम कदम, डॉ.सुहास सदाव्रते, साईनाथ पवार, संतोष आवटे, डॉ. यशवंत सोनुने, राजेंद्र घुले आदींची उपस्थिती होती.