कुतूबपुरा येथे कुलरच्या १२० मोटार चोरट्यांनी पळविल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:05 IST2021-09-08T04:05:01+5:302021-09-08T04:05:01+5:30
बांधकाम साहित्य चोरल्याचा गुन्हा औरंगाबाद : चिमनुरवाडी येथे पुलाजवळ ठेवलेले ११ हजार रुपये किमतीचे सळईचे तुकडे, लोखंडी जॅक, चॅनल, ...

कुतूबपुरा येथे कुलरच्या १२० मोटार चोरट्यांनी पळविल्या
बांधकाम साहित्य चोरल्याचा गुन्हा
औरंगाबाद : चिमनुरवाडी येथे पुलाजवळ ठेवलेले ११ हजार रुपये किमतीचे सळईचे तुकडे, लोखंडी जॅक, चॅनल, लोखंडी फावडे चोरल्याच्या आरोपावरून हर्सूल पोलीस ठाण्यात आरोपी संजय नाथू मुळे (रा. नायगाव) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याविषयी हबीब भुरा रहेमना यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली.
------------------------------
तडीपार गुंड अटकेत
औरंगाबाद : तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून शहरात आलेल्या कुख्यात गुंड रवी रमेश गायकवाड (३२, रा. ब्रीजवाडी)यास एमआयडीसी सिडको पोलिसांनी ६ सप्टेंबर रोजी दुपारी अटक केली. गस्तीवरील पोलीस हवालदार नितेश सुंदर्डे यांनी त्याच्यावर कारवाई केली.
-------------------------------------------
सिडको बसस्थानक येथून दुचाकी पळविली
औरंगाबाद : सिडको बसस्थानकाजवळ दुचाकी उभी करून बाहेरगावी कामाला गेलेल्या मुदस्सीर फातेमा खमर अली (रा. रोशनगेट) यांची दुचाकी (एमएच-२० एफई ६११६) चाेरट्यांनी लंपास केल्याची घटना ६ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
--------------------------