कुंडलवाडी ठाण्यातील महिला शिपायाची आत्महत्या

By Admin | Updated: August 28, 2014 00:00 IST2014-08-27T23:58:18+5:302014-08-28T00:00:37+5:30

बिलोली/कुंडलवाडी : महिला पोलिस शिपाई संगीता पिराजी इबीतवार हिने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली.

Kundalwadi woman suicides in Thane | कुंडलवाडी ठाण्यातील महिला शिपायाची आत्महत्या

कुंडलवाडी ठाण्यातील महिला शिपायाची आत्महत्या

बिलोली/कुंडलवाडी : कुंडलवाडी येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलिस शिपाई संगीता पिराजी इबीतवार (वय ३०) हिने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली.
कुंडलवाडी ठाण्यातील संगीता इबितवार ही महिला शिपाई कुंडलवाडी येथे भाड्याने राहत होती़ तीने बुधवारी सायंकाळी आत्महत्या केली़ घटनेचे वृत्त वृत्त कळताच धर्माबादचे उपविभागीय पोलिस अधिकारी विष्णूपंत बेदरे, बिलोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोघ गावकर, जिल्हा पोलिस अधीक्षक परमजितसिंह दहिया यांनी घटनास्थळी भेट दिली़ मयत महिलेचे नातेवाईक उशिरापर्यंत कुंडलवाडीत पोहोचले नसल्यामुळे शवविच्छेदन सुरू झाले नव्हते़
या प्रकरणी कुंडलवाडी पोलिसांत सुनीता रघुनाथ चव्हाण यांच्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
दरम्यान, मयत महिला पोलिसाने ठाण्यातील अधिकाऱ्यांविरूध्द वरीष्ठांकडे तक्रार केली होती़ यापूर्वीही तिने अशा तक्रारी केल्याची माहिती प्राप्त झाली़ (वार्ताहर)
शवविच्छेदनानंतरच माहिती पुढे येईल
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक परमजीतसिंघ दहिया यांनी घटनास्थळी भेट दिली़ या घटनेबाबत दहिया यांनी शवविच्छेदनानंतरच अधिक माहिती देता येईल असे सांगितले़ सदर महिला शिपाई २३ आॅगस्ट ते २८ आॅगस्ट या कालावधीत रजेवर होती़ घटनेनंतर कुटुंबीय बोलण्याच्या मन:स्थितीत नसल्याने अधिक माहिती मिळवता येत नाही़ त्याचवेळी महिला शिपाई इबीतवार यांच्या तक्रारीबाबतही चौकशी करण्यात आली होती असेही दहिया यांनी स्पष्ट केले़

Web Title: Kundalwadi woman suicides in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.