कुंडलिका नदीतील वाळू उपशाचे खड्डे बुजवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:37 IST2017-08-12T00:37:23+5:302017-08-12T00:37:23+5:30
कुंडलिका नदीतून वाळू उपसा सुरू असल्याने मोठे खड्डे पडल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. याची दखल घेत शुक्रवारी पोकलेनच्या साहाय्याने हे खड्डे बुजविण्यात आले.

कुंडलिका नदीतील वाळू उपशाचे खड्डे बुजवले
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील कुंडलिका नदीतून वाळू उपसा सुरू असल्याने मोठे खड्डे पडल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. याची दखल घेत शुक्रवारी पोकलेनच्या साहाय्याने हे खड्डे बुजविण्यात आले.
कुंडलिका नदीच्या खोलीकरणाचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. हे काम योग्य पद्धतीने व्हावे यासाठी लोकमत सुरुवातीपासून पाठपुरावा करत आहे.
दरम्यान, एकीकडे खोलीकरणाचे काम सुरू असताना वरील बाजूस काटेरी झुडपांच्या आडून बिनबोंभाट वाळू उपसा सुरू असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने नदीपात्रातील संपूर्ण काटेरी झुडपे पोक लेनच्या मदतीने साफ करून नदीपात्र मोकळे केले आहे.
शिवाय वाळू उपशामुळे पडलेले खड्डेही बुजविण्यात येत आहे. शुक्रवारी सहा ते सात पोकलेशनच्या मदतीने खोलीकरणाचे काम सुरू असल्याचे पहावयास मिळाले.