कुंभार पिंपळगावला तहसीलदारांची भेट

By Admin | Updated: June 18, 2016 00:51 IST2016-06-18T00:39:56+5:302016-06-18T00:51:11+5:30

कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगावात तहसीलदार कैलास अंडिले यांनी भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला.

Kumbhar Pimplgaon tehsildar's visit | कुंभार पिंपळगावला तहसीलदारांची भेट

कुंभार पिंपळगावला तहसीलदारांची भेट


कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगावात तहसीलदार कैलास अंडिले यांनी भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी सरपंच नाजुकबी कुरेशी, रामेश्वर लोया, सिद्धेश्वर कंटुले, भागवत राऊत, शिवाजी वळसे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
यावेळी तहसीलदार अंडिले यांनी गावातील नाला सरळीकरण, कृषी उत्पन्न बाजार समिती, पाझर तलावाला भेट देऊन पाहणी केली. तसेच ग्रामस्थांना झाडे लावण्याचे आवाहन केले. प्रत्येकाने एक तरी झाड लावावे व ते जोपासावे असे आवाहन केले. नाला सरळीकरण काळाची गरज असून, नाला सरळीकरणामुळे पाण्याच्या पातळीत भविष्यात वाढ होणार असून, सर्वांनी या बाबीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी अजिम पठाण, बबलू कंटुले, अन्सीराम कंटुले, गंगाधर लोढे, रामेश्वर लोया, महारूद्र गबाळे, रंगनाथ साळवे, गजानन शहाणे, विष्णू आनंदे, तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठलराव कंटुलेसह उपस्थिती होते. (वार्ताहर)

Web Title: Kumbhar Pimplgaon tehsildar's visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.