कोळी समाजासाठी केंद्रात आवाज उठवणार
By Admin | Updated: October 7, 2014 00:14 IST2014-10-07T00:07:13+5:302014-10-07T00:14:10+5:30
भोकर : पुढची पाऊले टाकताना सामाजिक समस्यांना वाचा फोडण्याचे काम मी करतोय़ आदिवासी कोळी समाजबांधवाच्या समस्यांसाठी मी सतत प्रयत्न केले़ आता याबाबत केंद्रातही आवाज उठवणार आहे़

कोळी समाजासाठी केंद्रात आवाज उठवणार
भोकर : पुढची पाऊले टाकताना सामाजिक समस्यांना वाचा फोडण्याचे काम मी करतोय़ आदिवासी कोळी समाजबांधवाच्या समस्यांसाठी मी सतत प्रयत्न केले़ आता याबाबत केंद्रातही आवाज उठवणार आहे़ प्रत्येक समाजाला कोणी ना कोणी मित्र असतो़ तसा मी कोळीमित्र आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी मुदखेड येथे झालेल्या आदिवासी कोळी समाज संघटनेच्या मेळाव्यात केले़
रणछोडदास मंगल कार्यालयात झालेल्या मेळाव्यात व्यंकटराव मुदिराज, पं़ स़ सभापती सखुबाई गोणेवाड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंदराव वागेलीकर, शंकरराव बारडकर, सिद्धेश्वर पिटलेवाड, संजय मोरे, संजय कोलते, पुरभाजी मदनवाड यांची उपस्थिती होती़
खा. अशोकराव चव्हाण म्हणाले, गरीब माणसासाठी मी नेहमीच धावून येतो़ मराठा आरक्षण, मुस्लिम समाजाचे आरक्षण असो वा इतर समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेसचा पुढाकार राहिला आहे़ कोळी समाजाचा संघर्ष मी जवळून पाहिला आहे़ यामुळे या समाजातील कठीणप्रसंगी मी सोबत होतो़
नवीन पिढीसाठी चांगले दिवस यावेत यासाठी सतत प्रयत्न करणार आहे़ ज्यांची मागील निवडणुकीत अनामत रक्कम जप्त झाली ते पाच वर्षे मतदार संघापासून गायब होते़ आता दस्ती बदलून अच्छे दिन तोंडी घालून फिरत आहेत़ ते कुठेही गेले तरी जनसामान्यांच्या प्रश्नाला न्याय देवू शकत नाहीत, असा टोला डॉ़ किन्हाळकरांना नाव न घेता अशोकरावांनी लगावला़
यावेळी अमिता चव्हाण यांना निवडून देण्याचे आवाहन चव्हाण यांनी केले़ मतदारसंघाच्या विकासासोबतच तुमचे कोणतेही काम असू द्या, आमदार व खासदारांचे पत्र एकदाच मिळेल, असेही अशोकरावांनी सांगितले़ (वार्ताहर)