‘किशोरी उत्कर्ष मंच’ उपक्रमाविनाच !
By Admin | Updated: March 31, 2015 00:37 IST2015-03-31T00:02:24+5:302015-03-31T00:37:54+5:30
बाळासाहेब जाधव , लातूर राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत किशोरी उत्कृष्ट युवती मंच स्थापन करण्यात आला आहे. मात्र या मंचमार्फत एकही उपक्रम राबविला गेला नसल्याने हा मंच उपक्रमाविनाच आहे.

‘किशोरी उत्कर्ष मंच’ उपक्रमाविनाच !
बाळासाहेब जाधव , लातूर
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत किशोरी उत्कृष्ट युवती मंच स्थापन करण्यात आला आहे. मात्र या मंचमार्फत एकही उपक्रम राबविला गेला नसल्याने हा मंच उपक्रमाविनाच आहे. जिल्ह्यातील ४४ शाळांचा सहभाग असलेल्या या मंचद्वारे गेल्या तीन वर्षांपासून एकही उपक्रम झाला नाही. त्यामुळे या मंचला आलेला निधी गेला कोठे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
राज्य शासनाने राज्यातील मुलींनी शिक्षणाच्या प्रवाहात यावे, त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील सर्वच बाबीचे चौफेर ज्ञान व्हावे या दृष्टीकोनातून माध्यमिक शिक्षा अभियान विभागाच्या वतीने किशोरी उत्कर्ष युवा मंचच्या माध्यमातून पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींसाठी अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला़ या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थिनींचे विविध प्रश्न मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचण्यासाठी तक्रारपेटी बसविणे, तसेच विद्यार्थिनींची वाटचाल यशस्वी व्हावी या दृष्टीकोनातून वैचारिक मेजवानी तसेच या विविध उपक्रमाच्या कालावधीत विद्यार्थिनींची नाष्टा व चहा-पाण्याची सोय व्हावी, यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले़ राज्य शासनाने सुरू केलेला हा उपक्रम राबविण्यासाठी जिल्हाभरातील ४९ शाळापैकी ४४ शाळांची निवड करण्यात आली़ या शाळेत विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रत्येक शाळेला दहा हजार या प्रमाणे निधी आॅक्टोबर ते नोव्हेंबर २०१४ या कालावधीत लातूर जिल्ह्यातील ४९ शाळेपैकी ४४ शाळांना निधी वितरीतही करण्यात आला़ मात्र या शाळांनी युवती मंचचा उपक्रमच राबविला नाही. शिवाय, निधी कोठे खर्च झाला, याचा लेखाजोखाही नाही.