कीर्तन महोत्सवास प्रारंभ
By Admin | Updated: December 31, 2016 22:08 IST2016-12-31T22:03:48+5:302016-12-31T22:08:04+5:30
बीड: येथील स्व. झुंबरलाल खटोड प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाला शनिवारी प्राचार्य शिवाजीराव भोसले अध्यात्म नगरीत मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला

कीर्तन महोत्सवास प्रारंभ
बीड: येथील स्व. झुंबरलाल खटोड प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाला शनिवारी प्राचार्य शिवाजीराव भोसले अध्यात्म नगरीत मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
यावेळी आसाराम खटोड, परशुराम मराडे, ज्ञानोबा कुटे, सुभाषचंद्र सारडा, अॅड. विजयकुमार देशपांडे, महावितरणचे अधीक्षक अभियंता रतन सोनुले, अभय कोटेचा, भरत लोळगे, उज्वल कोटेचा, अशोक लोढा, बिपीन लोढा, रतनलाल नहार यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व संत प्रतिमापूजन पार पडले.
यावेळी ‘तुका आकाशा एवढा’हा संगीतमय कार्यक्र म पार पडला. गणेश शिंदे यांनी संत तुकारामांचा जीवनपट उलगडताना तुकोबांची गाथा सर्वांना प्रेरणा देत असल्याचे म्हटले. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ यासह इतर अभंगरचना त्यांनी सादर केल्या.
प्रारंभी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड, सचिव सुशील खटोड, शुभम खटोड, आशिष खटोड यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा सत्कार झाला. सूत्रसंचलन राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी महाराज, तर प्रज्ञा रामदासी यांनी मंगलाचरण केले. आशिष खटोड यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)