घाटी रुग्णालयातील कर्मचाºयांना किरण गणोरे करायचा ‘ब्लॅकमेल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:47 IST2017-09-12T00:47:23+5:302017-09-12T00:47:23+5:30
सातारा परिसरातील छत्रपतीनगरातील बँक व्यवस्थापकाच्या खून प्रकरणात अटक झालेला किरण गणोरे हा घाटी रुग्णालय अभ्यागत समिती सदस्यत्वाचा गैरफायदा घेत कर्मचाºयांना ब्लॅकमेल करीत असल्याचे समजते.

घाटी रुग्णालयातील कर्मचाºयांना किरण गणोरे करायचा ‘ब्लॅकमेल’
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सातारा परिसरातील छत्रपतीनगरातील बँक व्यवस्थापकाच्या खून प्रकरणात अटक झालेला किरण गणोरे हा घाटी रुग्णालय अभ्यागत समिती सदस्यत्वाचा गैरफायदा घेत कर्मचाºयांना ब्लॅकमेल करीत असल्याचे समजते. अनेकांना धमकावून त्याने पैसे उकळले. अटकेमुळे अखेर त्याच्या जाचातून सुटल्याचा नि:श्वास सोडत सोमवारी (दि. ११) घाटीत अनेक कर्मचाºयांनी आनंदोत्सव साजरा केला.
घाटी रुग्णालयात सोमवारी दिवसभर किरण गणोरे अटकेची चर्चा रंगली होती. अभ्यागत समितीमध्ये २०१६ मध्ये किरण गणोरे यास सदस्यत्व मिळाले. ही समिती रुग्णालयातील रुग्णसेवा, येथील प्रश्न दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. दोन ते तीन महिन्यांत होणाºया बैठकीत विविध विषयांवर चर्चा होते. समितीच्या सदस्यांना स्वत:च्या सूचना, अभिप्राय रुग्णालयाच्या कर्मचाºयांना परस्पर न कळविता अधिष्ठाता अथवा वैद्यकीय अधीक्षकांना कळविणे आवश्यक आहे. तसेच सदस्यांना एखाद्या कक्षास भेट द्यावयाची असल्यास प्रभारी वैद्यकीय अधिकारी किंवा प्रभारी परिचारिकांची उपस्थिती आवश्यक असते; परंतु किरण गणोरे यास फाटा देत स्वत:ची मनमानी करीत होता,असे कर्मचाºयांचे म्हणणे आहे. अभ्यागत समितीच्या बैठकीत प्रश्न उपस्थित क रू, असे धमकावत घाटीतील अनेक वॉर्डात, विभागातील कर्मचाºयांना गणोरे त्रास देत होता. बैठकीत सदस्यांचेच ऐकले जाते, कर्मचाºयांची कोणतीही बाजू ऐकून न घेता चौकशीचा फेरा लावला जातो. त्यामुळे त्याचा त्रास निमूटपणे सहन करावा लागत होता, असे कर्मचाºयांनी म्हटले. घाटीतील निवासस्थान मिळावे म्हणून कर्मचाºयांवर दबाव आणत होता. घाटीत फिरणाºया खाजगी लॅबच्या लोकांकडून पैसे उकळत होता, असेही काहींनी सांगितले. खून प्रक रणात गणोरे अटक झाल्याने त्याच्या त्रासातून सुटल्याची भावना अनेक कर्मचाºयांनी व्यक्त केली.