साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राजा ढाले
By Admin | Updated: January 12, 2015 14:30 IST2015-01-12T13:50:32+5:302015-01-12T14:30:18+5:30
फुले - आंबेडकर विचारधारा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विचारवंत राजा ढाले यांची निवड करण्यात आली आहे. २५ जानेवारीला संमेलनाचे आयोजन केले आहे.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राजा ढाले
नांदेड : फुले - आंबेडकर विचारधारा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विचारवंत राजा ढाले यांची निवड करण्यात आली आहे. २५ जानेवारीला संमेलनाचे आयोजन केले आहे.
फुले - आंबेडकर विचारधारा निमंत्रकीय समिती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने कुसुम सभागृहात होणार्या या संमेलनाचे उद्घाटन सदाशिवराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. आंबेडकरी चळवळीसाठी संपूर्ण आयुष्य वेचणारे कार्यकर्ते एन. डी. गवळे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तर जलसाकार प्रतापसिंग बोदडे, प्राचार्य व्ही. एन. इंगोले, डॉ. बबन जोगदंड, डॉ. जगदीश कदम, प्रा. रविचन्द्र हडसनकर, प्रा. संध्या रंगारी हे उपस्थित राहणार आहेत. /(प्रतिनिधी)