घरमालकास मारहाण करून २० हजार लांबविले

By Admin | Updated: May 25, 2015 00:24 IST2015-05-25T00:02:17+5:302015-05-25T00:24:39+5:30

परतूर : परतूर शहरातील एका घरावर चोरांनी घर मालकाच्या डोक्यात लोखंडी गज मारून त्यास गंभीर जखमी आणि चोरी केली. या घटनेत २० हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.

By killing the homeman 20 thousand long | घरमालकास मारहाण करून २० हजार लांबविले

घरमालकास मारहाण करून २० हजार लांबविले


परतूर : परतूर शहरातील एका घरावर चोरांनी घर मालकाच्या डोक्यात लोखंडी गज मारून त्यास गंभीर जखमी आणि चोरी केली. या घटनेत २० हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.
गाव भागातील माने गल्लीतील अशोक कबीरराव माने हे दि. २४ रोजी रात्री घरात झोपलेले असतांना रात्री दोनच्या सुमारास अज्ञात दोन चोरट्यांनी लोखंडी गेट तोडून घरात प्रवेश केला. अशोक माने यांच्या तोंडावर बॅटरी मारून डोक्यात पाठीमागून डोक्यात लोखंडी गज मारून जखमी केले व पत्नी सोडावयास आली असता तिला मारहाण करून गळयातील सोन्याचे मनी मगंळसुत्र हिसकावून नेले.
भरवत्स्तीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी परतुर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: By killing the homeman 20 thousand long

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.