रुग्णवाहिका-ट्रक अपघातात एक जागीच ठार; एक गंभीर
By Admin | Updated: May 18, 2017 00:30 IST2017-05-18T00:27:13+5:302017-05-18T00:30:37+5:30
चंदनझिरा : जालना-औरंगाबाद महामार्गावरील टोल नाक्याजवळील पुलावर भरधाव रुग्णवाहिकेने ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली.

रुग्णवाहिका-ट्रक अपघातात एक जागीच ठार; एक गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंदनझिरा : जालना-औरंगाबाद महामार्गावरील टोल नाक्याजवळील पुलावर भरधाव रुग्णवाहिकेने ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली. यात चालकाच्या बाजूला बसलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात बुधवारी सकाळी २.३० च्या दरम्यान घडला.
रुग्णवाहिका (एम.एच.२८-एएन - ८२५५) ही गाडी चिखली येथून रुग्णाला औरंगाबादला सोडण्यासाठी गेली होती. रुग्ण सोडून ती परत चिखलीकडे जात असताना औरंगाबाद रोडवरील टोलनाक्याजवळ ट्रक (एम.एम.१२-एमव्ही-१६२९) ला पाठीमागून जोरात धडकली. यामध्ये चालकाच्या बाजूला बसलेले तुळशीदास नारायण चव्हाण (४२) रा. मलगी ह.मु. चिखली जि. बुलडाणा हे जागीच ठार झाले.
चालक विष्णू राठोड (४०) रा. आयकवाडी, ता. चिखली हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर जालना येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. दिनेश कृपाशंकर पांडे, रा. बस्तर ता. कालगंज जि. मिर्झापूर (उत्तर प्रदेश) यांच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलिस ठाण्यात रुग्णवाहिका चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास चंदनझिरा पोलिस करीत
आहे.