शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

Killari Earthquake :...आणि मदतीचा ओघ सुरू झाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 7:42 PM

३० सप्टेंबर १९९३ ची ती काळजाचा ठोका चुकवणारी पहाट. किल्लारी आणि परिसरात भूकंपाने क्षणार्धात होत्याचं नव्हतं केलं होतं. राजेंद्र दर्डा यांनी त्याचक्षणी वेगाने सूत्रे हलवायला सुरुवात केली. लोकमतची यंत्रणा सतर्क केली. तातडीनं सामाजिक, स्वयंसेवी संस्था-संघटनांची बैठक ‘लोकमत’च्या जवाहर सभागृहात आयोजित केली. या बैठकीतच १ लाख ६९ हजार रुपये जमा झाले. अल्पावधीतच या बैठकीला फार मोठा प्रतिसाद मिळाला. 

- स.सो. खंडाळकर 

२ आॅक्टोबर १९९३ रोजीची दरवर्षीप्रमाणे निघणारी लोकमतची राष्ट्रीय एकात्मता रॅली  रद्द करण्यात आली. भूकंपग्रस्तांना मोठ्या प्रमाणावर अन्न, वस्त्र व रोख मदत पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला.  या महत्त्वपूर्ण बैठकीला दिवंगत झुल्फिकार हुसेन, प्र.ज. निकम गुरुजी, डॉ. शांताराम काळे, वसंत नरवडे, एम.ए. गफार, राम भोगले, डॉ. पुरुषोत्तम दरख, भागचंद बिनायके, मनसुख बांठिया, मनमोहन अग्रवाल, नगीन संघवी, भिकचंद दोशी, विमल टिबडीवाला, एस.पी. जवळकर, राम पातूरकर, सुभाष झांबड, शरद परिहार, विमल टिबडीवाला, कुलदीपसिंग निºह, व्ही.सी. बजाज, प्रा. शंकरराव वनवे, विनोद मेहरा, चेनराज देवडा, सूरजितसिंग खुंगर, तनसुख झांबड, प्रकाश राठी, दिलीप सोनी, संतोष लुणिया, दिलीप गौर, जगन्नाथअप्पा वाडकर, रतिलाल मुगदिया, फादर मायकेल डिसोझा, एम.के. अग्रवाल, शरद बन्सल, शिवाजी लिंगायत, सतीश सिकची, अनिल मिश्रा, आर.जी. मालानी, त्रिलोक पांडे, दिलीप चोटलानी, शांताराम जोशी, एस.एल. देशमुख, जितेंद्र तोतला, विजय छाजेड, संजय बलदवा, अनिल अग्रवाल, नीरज तोटावार, सत्यनारायण अग्रवाल, सतीश लड्डा, मनोज भारुका, रमेशचंद्र जोशी, शिरीष बोराळकर, रत्नाकर पंडित, अशोक मालू यांच्यासह कितीतरी महत्त्वाची माणसे राजेंद्र दर्डा यांच्या हाकेला ओ देऊन जमा झाली होती. 

भूकंपग्रस्तांसाठी ब्लँकेटस्, सतरंजी, बादली, पातेले, इतर भांडी धान्य घेऊन वाहने रवाना करण्यात आली. मदत नेमकी कोठे व कशी पुरवायची, यासाठी एक समितीही स्थापन करण्यात आली. ही समिती राजेंद्र दर्डा  यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधत होती. दिवंगत जवाहरलाल दर्डा हे त्या काळात राज्याचे उद्योगमंत्री होते. भूकंपग्रस्तांना उद्योगपतींनी मोठ्या प्रमाणावर मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले होते. त्याचा परिणाम म्हणूनही मदतकार्याला वेग आला होता. 

जिल्हाधिकाऱ्यांची सकारात्मक भूमिकातत्कालीन जिल्हाधिकारी प्रमोद माने यांचीही यातली भूमिका अत्यंत सकारात्मक राहिली. आता ते हयात नाहीत; पण भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले होते. लोकमतच्या आवाहनानुसार विविध संस्था-संघटनांनी मोठा पुढाकार घेतला. पहाटेच्या काळोखात गाडल्या गेलेल्या खेड्यांना दिलासा देण्याचं व त्यांच्यासाठी काही तरी करीत राहण्याची भूमिका लोकमतनं सातत्यानं घेतली. त्याचाच एक भाग म्हणून १९९६ साली सास्तूर येथे अंगणवाड्या उभारण्यात आल्या. राजेंद्र दर्डा यांचा यातला सामाजिक बांधिलकीचा दृष्टिकोन, त्यांच्या हाकेला ओ देऊन पुढे आलेली मंडळी व लोकमतचे उत्कृष्ट टीमवर्क यातूनच हे महत्कार्य घडत गेलं.  

टॅग्स :Killari Earthquakeकिल्लारी भूकंपAurangabadऔरंगाबादRajendra Dardaराजेंद्र दर्डा