आत्याच्या पतीकडून तलवारीने वार

By Admin | Updated: May 24, 2014 01:34 IST2014-05-24T00:58:32+5:302014-05-24T01:34:07+5:30

पिंपळनेर : बीड तालुक्यातील गुंदावाडी येथे आत्याला भेटण्यासाठी गेलेल्या भाच्यावर आतेमामाने तलवारीने वार केले़ ही घटना गुरुवारी घडली़

Kill her husband with a sword | आत्याच्या पतीकडून तलवारीने वार

आत्याच्या पतीकडून तलवारीने वार

पिंपळनेर : बीड तालुक्यातील गुंदावाडी येथे आत्याला भेटण्यासाठी गेलेल्या भाच्यावर आतेमामाने तलवारीने वार केले़ ही घटना गुरुवारी घडली़ या प्रकरणी पिंपळनेर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोर फरार आहे. ज्योतीराम उर्फ लालासाहेब बाबूराव पन्हाळे (रा़ मोहनगिरवाडी ता़ बीड) असे जखमीचे नाव आहे़ त्यांच्या आत्या शोभा सुुंदरराव सन्ने या गुंदावाडी येथे वास्तव्यास आहेत़ शोभा यांना त्यांचे पती सुंदरराव हे सतत मारहाण करतात़ त्यामुळे ज्योतीराम पन्हाळे व बंडू पन्हाळे हे दोघे आपल्या आत्या शोभा यांना भेटण्यासाठी गेले होते़ आम्ही आत्याला घेऊन जातो असे ते म्हणाले़ तेंव्हा आत्याचे पती सुंदरराव सन्ने याने ज्योतीराम यांच्यावर तलवारीने हल्ला चढविला़ त्यांच्या डोक्यात व दोन्ही हाताला गंभीर इजा झाली आहे़ बंडू पन्हाळे यांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या़ याप्रकरणी पिंपळनेर ठाण्यात कलम ३०७, आर्म अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा नोंद केला आहे़ तपास सहायक निरीक्षक इंगळे करत आहेत़ दरम्यान, आरोपी सुंदरराव सन्ने फरार आहे. त्याचा शोध सुरू असल्याचे सहायक निरीक्षक इंगळे यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Kill her husband with a sword

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.