शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वाचन संस्कृती रुजविणारा ‘किड्स कॉर्नर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 17:14 IST

लहान मुलांना अवांतर वाचनाची आवड लावणे, हा एकमेव उद्देश

- रुचिका पालोदकर औरंगाबाद : आजची मुले अवांतर पुस्तके  वाचत नाहीत, त्यांना वाचनाची गोडी अजिबातच नाही, अशी ओरड अनेक पालक करीत आहेत; पण मुळात बहुतांश मुलांना हल्ली पालकच वाचताना दिसत नाहीत. त्यामुळे वाचन करायचे असते, हे मुलांना कळणार तरी कसे, म्हणूनच आजच्या मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी जीवन विकास ग्रंथालयातर्फे मागील दोन वर्षांपासून ‘किड्स कॉर्नर’ सुरू करण्यात आला आहे. 

‘वाचन संस्कृती जपूया, संस्कार धन वाढवूया...’ या ब्रीदवाक्यानुसार याठिकाणी काम होते. संगीता मंडलिक आणि प्रियंका डसगावकर वाचन कक्षाचे काम पाहतात. याविषयी अधिक सांगताना त्या म्हणाल्या की, दोन वर्षांपूर्वी वाचन प्रेरणा दिनापासून आम्ही या कक्षाची सुरुवात केली. लहान मुलांना अवांतर वाचनाची आवड लावणे, हा एकमेव उद्देश यामागे आहे. दररोज सायंकाळी ६ ते ७ या वेळेत हा वाचन कक्ष सुरू असतो. यावेळी शाळकरी मुलांनी यावे आणि या कक्षात खास मुलांसाठी ठेवण्यात आलेले हवे ते पुस्तक वाचावे, असा दिनक्रम असतो; पण अनेकदा मुले पुस्तक वाचून कंटाळलेली दिसायची म्हणून मग आम्ही याला पूरक असे अनेक उपक्रम या कक्षात सुरू केले, असे मंडलिक यांनी सांगितले.

या वाचन कक्षांतर्गत मुलांना कसे आणि काय वाचावे यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येते. अनेकदा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ मंडळींना, शहरातील साहित्यिकांना आमंत्रित केले जाते. बऱ्याचदा मंडलिक आणि डसगावकर या स्वत: मुलांना विविध पुस्तकांतील कथा वाचून दाखवितात. मराठीसोबतच इंग्रजी वाचनाची सवयही मुलांना लावली जाते. विविध बौद्धिक खेळांचे आयोजन केले जाते, तसेच वर्षभर दिन विशेषानुसार विविध स्पर्धा घेऊन मुलांना कथा सांगण्याची, भाषण करण्याची तसेच संवादकौशल्य विकसित करण्याची संधी दिली जाते. अनेक दा काही व्हिडिओ दाखवूनही मुलांना गोष्टी सांगितल्या जातात. 

सर्व शाळकरी विद्यार्थ्यांसाठी उपक्रमहा उपक्रम सर्व शाळकरी विद्यार्थ्यांसाठी खुला आहे. वाचन संस्कृती रुजविण्यासाठी पालक, शिक्षकांनी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. केवळ विद्यार्थ्यांना दोष देऊन उपयोग नाही. दोन वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे; पण तरी अजूनही बाल कक्षात येऊन वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय नाही. सोशल मीडियाच्या भपक्यापासून मुलांना दूर न्यायचे असेल, तर अशा प्रकारच्या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे गरजेचे आहे.- संगीता मंडलिक

टॅग्स :Studentविद्यार्थीAurangabadऔरंगाबादSocial Mediaसोशल मीडिया