अपहृत मुलगा गोरेगावात सापडला

By Admin | Updated: December 7, 2015 00:59 IST2015-12-07T00:45:28+5:302015-12-07T00:59:27+5:30

उस्मानाबाद : घरातून निघून गेलेला १४ वर्षांचा मुलगा मुंबईतील गोरेगाव परिसरात सापडला असून, शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि त्याच्या नातेवाईकांनी त्याला ताब्यात घेतले आहे़

A kidnapped son was found in Goregaon | अपहृत मुलगा गोरेगावात सापडला

अपहृत मुलगा गोरेगावात सापडला


उस्मानाबाद : घरातून निघून गेलेला १४ वर्षांचा मुलगा मुंबईतील गोरेगाव परिसरात सापडला असून, शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि त्याच्या नातेवाईकांनी त्याला ताब्यात घेतले आहे़ ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली होती़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिक्षक कॉलनी भागात राहणारा अश्विन रवींद्र कुदळे (वय-१४) हा मुलगा शुक्रवारी सकाळी ११़३० वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर गेला होता़ दिवसभरानंतर तो सायंकाळीही घरी न आल्याने नातेवाईकांनी त्याची शोधाशोध सुरू केली़ मात्र, तो सापडून येत नसल्याने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती़ या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ गुन्हा दाखल होताच तपासाधिकारी पोउपनि एस़एम़माने यांनी तपासाची चक्रे फिरविण्यास सुरूवात केली़ मुलाच्या नातेवाईकांकडे शोध घेण्यासह इतर विविध पद्धतीने त्याचा शोध सुरू केला़ शनिवारी अपहरत अश्विन हा मुंबईतील गोरेगाव परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़
या माहितीनंतर अश्विनचे नातेवाईक आणि शहर पोलीस ठाण्यातील पोना दीपक नाईकवाडी यांनी तत्काळ मुंबई-गोरेगावकडे धाव घेतली़ तोपर्यंत पोउपनि माने यांनी कुरार पोलिसांशी संपर्क साधून त्या युवकाला ताब्यात घेण्यास सांगितले़ कुरार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले़ अश्विनच्या पालकांनी व पोलीस कर्मचाऱ्यांनी रविवारी त्याला ताब्यात घेवून उस्मानाबादचा प्रवास सुरू केला होता़ दरम्यान, तो नातेवाईक, पोलिसांसह सोमवारी शहरात येणार आहे़

Web Title: A kidnapped son was found in Goregaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.