शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅसिडच्या धाकावर युवतीस पळविले

By admin | Updated: July 13, 2017 00:20 IST

हिंगोली : शहरातील श्रीनगर मधील एका मुलीच्या अंगावर तेजाब टाकण्याची धमकी देत २० जून रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास पळविल्या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील श्रीनगर मधील एका मुलीच्या अंगावर तेजाब टाकण्याची धमकी देत २० जून रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास पळविल्या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात १२ जुलै रोजी रात्री १० च्या सुमारास एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. श्रीनगर भागात माहेरी राहणारी ही विवाहित युवती आपल्या भावाच्या मुलीसोबत आदर्श महाविद्यालयात २० जून रोजी टी. सी काढण्यास गेली होती. दरम्यान, तेथे जिल्हा कचेरीतील पुरवठा विभागात काम करणारा कर्मचारी वहीदखान समशेरखॉन (४२) रा. श्रीनगर तेथे आला. त्याने या युवतीजवळ जावून ‘तुला काहीतरी बोलायचे आहे, थोड बाजूला चल नसता तुझ्या अंगावर तेजाब टाकतो’ असे म्हणत तिला बाजूला नेल. तिच्या पाठीमागे भावाची मुलगी जात असता तुझे तू काम कर, तू आलीस तर तुझ्याही अंगावर तेजाब टाकील, अशी धमकी दिली. त्यामुळे भावाची मुलगी परत आल्यानंतर ते दोघेही तेथून गायब झाल्याचे तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या मुलीने यापूर्वीही वहीद मोबाईलवर फोन करून त्रास देत असल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी सदर कर्मचाऱ्यास चौकशीसही बोलावले होते. आता हा प्रकार घडल्याने ३६६ कलमान्वये वहीदविरुद्ध गुन्हा दाखल झाला.पकडलेले वाळूचे वाहन चोरून नेलेऔंढा नागनाथ : येथील तहसील कार्यालयात वाळूची तस्करी करणारे जप्त केलेले ट्रॅक्टर वाळूमाफियांनी चोरून नेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औंढा तालुक्यातील बोरजा गावाजवळ अवैधपणे वाळूची तस्करी करीत असलेले ट्रॅक्टर मुद्देमालासह ताब्यात घेवून जप्त केल्याची कारवाई ३ जुलै रोजी करण्यात आली होती. सदर ट्रॅक्टर हे तहसील कार्यालयाचा कॅम्पस्मध्ये लावले होते. ११ जुलै रोजी जप्त केलेले ट्रॅक्टर सकाळी घेवून जात असताना शिपाई गायकवाड यांनी पाहिले होते. यावेळी गायकवाडने त्यांना कोणाच्या सांगण्यावरून घेवून जात असल्याचे विचारले असता त्यांनी कारकुन पाथरकर यांनी सोडल्याचे खोटे सांगून ट्रॅक्टर वाळूसह घेवून गेले असल्याचे फिर्यादी नमूद केले आहे. नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांनी वाहनचालक आयुब कडू शेख. (रा. हिंगोली) व मालक शमू जलाल शेखविरूद्ध चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.