महिलेचा अनैतिक संबंधातून खूनौ
By Admin | Updated: July 29, 2016 01:09 IST2016-07-29T00:58:10+5:302016-07-29T01:09:08+5:30
रंगाबाद : १९ जुलै रोजी रांजणगाव (ता. पैठण) रोडवरील म्हारोळा शिवारातील एका विहिरीत मृतावस्थेत आढळलेल्या महिलेची ओळख पटविण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले.

महिलेचा अनैतिक संबंधातून खूनौ
रंगाबाद : १९ जुलै रोजी रांजणगाव (ता. पैठण) रोडवरील म्हारोळा शिवारातील एका विहिरीत मृतावस्थेत आढळलेल्या महिलेची ओळख पटविण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले. अनैतिक संबंधातून त्या महिलेचा खून तिच्या प्रियकराने केल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले आहे. संतोष वामन सोनवणे (२३,रा. बिडकीन) अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे, तर मंदाबाई भागचंद भोगाडे (३६,रा. बिडकीन) असे मृत महिलेचे नाव आहे. याविषयी पैठणचे उपविभागीय पोलीस अधिकारी बच्चनसिंग यांनी सांगितले की, १९ जुलै रोजी म्हारोळा शिवारातील विहिरीत अनोळखी महिलेचे प्रेत सापडले होते. हे प्रेत कुजलेल्या अवस्थेत होते. शिवाय महिलेची ओळख पटविण्यासारखे विशेष काहीही नव्हते. तिच्या हातावर एस अक्षर गोंधलेले होते. कपड्याचे वर्णन, पायातील काळा दोरा याबाबतची माहिती सोशल मीडिया आणि वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात आली. कुजलेल्या प्रेताची ओळख न पटल्याने पोलिसांनी तिचे शवविच्छेदन केले. २२ जुलै रोजी तिच्या कपड्याच्या वर्णनावरून आणि हातावरील एस अक्षरावरून तिच्या नातेवाईकांनी ही मंदाबाई असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, स्थानिक गुन्हेशाखेचे कर्मचारी तांदळे, पोकॉ. तरमहे यांनी मोबाईल कॉल डिटेल्सच्या आधारे या खुनाचे गुढ उकलण्यात मदत झाली. पोलिसांनी संशयित संतोष सोनवणे यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याचे चार वर्षांपासून महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे समजले. दोन महिन्यांपूर्वी संतोषचे लग्न झाल्यानंतर तिचे दुसऱ्या व्यक्तीसोबत सूत जुळले. ही बाब संतोषला खटकली. त्यामुळे १२ जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास संतोष हा मंदाबाईला मोटारसायकलवर बसून रांजणगाव रोडवर गेला. तिला विश्वासात घेऊन तो विहिरीजवळ गेला. दोघे बराच वेळ विहिरीच्या काठावर बसून गप्पा मारत बसले होते. यावेळी त्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली तेव्हा तिने प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपीने उचलून तिला विहिरीत फेकून दिले आणि तो पळून गेला. या गुन्ह्याची त्याने कबुली दिली असल्याचे आयपीएस बच्चनसिंग यांनी सांगितले. या खुनाचा छडा लावण्यासाठी उपनिरीक्षक अरुण डोंगरे, विठ्ठल आईटवार आणि कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.