खुलताबादेत झन्ना मन्ना खेळणाऱ्या जुगाऱ्यांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:02 IST2021-03-07T04:02:21+5:302021-03-07T04:02:21+5:30
शुक्रवारी पानमळ्याजवळील पाण्याच्या टाकीजवळ दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक कमल शिंदे, भगवान चरवंडे, हनुमंत सातपुते, ...

खुलताबादेत झन्ना मन्ना खेळणाऱ्या जुगाऱ्यांना पकडले
शुक्रवारी पानमळ्याजवळील पाण्याच्या टाकीजवळ दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक कमल शिंदे, भगवान चरवंडे, हनुमंत सातपुते, इम्रान सय्यद यांच्या पथकाने ही कारवाई केली. या ठिकाणी पैसे लावून इान्ना मन्ना नावाचा जुगार खेळला जात होता. पोलिसांच्या या छाप्यात पाच दुचाकी, पाच मोबाइल आणि रोख ३,४०० रुपयांसह जुगाराचे साहित्य असा २ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात जुगार खेळणारे शेख हसन शेख निजाम, अंबादास सोनवणे, जाफरशहा उस्मान, भीमराव आसाराम कदम, कृष्णा महादू भागडे, शेख बशीर शेख गनी यांना खुलताबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात जुगार खेळला जात असल्याने नागरिक हैराण होते. वारंवार होणाऱ्या त्रासामुळे नागरिक वैतागले होते. याची दखल घेत, पोलिसांनी ही कारवाई केली आहे.