खामनदीवरील पूल बनला धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 21:51 IST2019-05-24T21:51:38+5:302019-05-24T21:51:50+5:30
वाळूजच्या खामनदीवरील पुलाची दुरावस्था झाल्याने हा पूल धोकादायक बनला आहे. अपघाताचा धोका बळावल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांना ये-जा करताना गैरसोय होत आहे.

खामनदीवरील पूल बनला धोकादायक
वाळूज महानगर : वाळूजच्या खामनदीवरील पुलाची दुरावस्था झाल्याने हा पूल धोकादायक बनला आहे. अपघाताचा धोका बळावल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांना ये-जा करताना गैरसोय होत आहे.
वाळूज येथील हनुमान नगरातून स्मशानभूमीकडे जाणाºया रस्त्यावरील खाम नदीवर पूल उभारला आहे. गतवर्षी पावसामुळे पुलाचा काही भाग वाहून गेला. संबंधित प्रशासनाने मातीचा भराव टाकून पुलाची दुरुस्ती केली. पण आजघडीला पुलाची दयनीय अवस्था झाली आहे. पुलाचा एका बाजूचा अर्धा भाग पडला असून, पुलावरील काही भागातील संरक्षण कठडेही गायब झाले आहेत.
त्यामुळे हा पूल वाहनधारकांसाठी धोकादायक बनला आहे. पर्यायी रस्ता नसल्याने नागरिकांसह परिसरातील शेतकऱ्यांना तसेच वाळूज औद्योगिक क्षेत्रात कामासाठी येणारे लगतच्या भागातील कामगार रात्री-अपरात्री येथूनच ये-जा करतात. संबंधित प्रशासन पावसाळ्यापूर्वी पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.