खो-खो स्पर्धेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 23:48 IST2018-01-03T23:48:37+5:302018-01-03T23:48:57+5:30
खा. चंद्रकांत खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त ६ व ७ जानेवारी रोजी औरंगपुरा येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर आंतरशालेय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

खो-खो स्पर्धेचे आयोजन
औरंगाबाद : खा. चंद्रकांत खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त ६ व ७ जानेवारी रोजी औरंगपुरा येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर आंतरशालेय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या संघास २00१ रुपये व चषक देण्यात येणार आहे. उपविजेत्या संघास १00१ रुपये व चषक दिला जाणार आहे, तसेच वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करणाºया खेळाडूंनाही पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सहभागी होणाºया संघांनी त्यांचा प्रवेश ५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत निश्चित करावा. अधिक माहितीसाठी उदय पंड्या, स. भु. महाविद्यालय, श्रीपाद लोहकरे, स्टडी सर्कल, औरंगपुरा आणि योगेश सोळुंके यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी सहभाग नोंदवावा, असे दी औरंगाबाद जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष सचिन मुळे, सचिव गोविंद शर्मा, गोपाल कुलकर्णी आदींनी केले आहे.