खरिपाची पैसेवारी ५० पैशापेक्षा अधिक !
By Admin | Updated: January 8, 2017 23:47 IST2017-01-08T23:45:25+5:302017-01-08T23:47:21+5:30
उस्मानाबाद : खरीप हंगामाची पैसेवारी जिल्हा प्रशासनाने नुतीच जाही केली आहे.

खरिपाची पैसेवारी ५० पैशापेक्षा अधिक !
उस्मानाबाद : खरीप हंगामाची पैसेवारी जिल्हा प्रशासनाने नुतीच जाही केली आहे. त्यानुसार जिल्हभारातील सर्व ७३७ गावांची पैसेवारी पन्नास टक्क्यांवर असल्याचे समोर आले आहे.
खरीप हंगामाच्या सुरूवातील बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यानंतर काहीकाळ ओढ दिली. परंतु, शेवटच्या टप्प्यात जिल्हाभरात धो..धो पाऊस झाला. तब्बल तीन ते चार वर्षांनंतर यंदा पावसाने सरासरी ओलांडली. अनेक गावांमध्ये खरीप पिकांचे पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले. जिल्हभरातील बहुतांश प्रकल्प शंभर टक्के भरले. अधिकच्या पर्जन्यमानाचाच पिरणाम म्हणून खरीप हंगामाची पैसेवारीचे प्रमाण पन्नास पैसेपेक्षा अधिक आले आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरूवातील प्राथमिक स्वरूपात पैसेवारी जाहीर केली होती. त्यानंतर डिसेंबरअखेर अंतीम पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार उस्मानाबाद तालुक्यातील १२८ गावांची सरासरी पैसेवारी ५३ एवढी जाहीर झाली आहे.
त्यानंतर तुळजापूर तालुक्यातील १२३ गावांची ५४, उमरगा तालुक्यातील ९४ गावांची सर्वाधिक ५७ पैसे, लोहारा तालुक्यातील ४७ गावांची ५४ पैसे, भूम तालुक्यातील ९६ गावांची ५२ पैसे, परंडा तालुक्यातील ९६ गावांची ५४ पैसे, कळंब तालुक्यातील ९७ गावांची ५३ पैसे आणि वाशी तालुक्यातील ५४ गावांची पैसेवारी ५३ पैसे एवढी जाहीर करण्यात आली आहे. सदरील पैसेवारी ही अंतीम आहे. दरम्यान, पैसेवारी पन्नास पैशापेक्षा अधिक असल्याने एकाही गावाला यंदा विशेष सवलती मिळणार नाहीत.