शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळमुक्तीचा खिर्डी पॅटर्न; पाच वर्षांपासून गाव टँकरमुक्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 22:45 IST

शासकीय विहिरीजवळ पुनर्भरण केल्यानं मुबलक पाणीपुरवठा

खुलताबाद (जि. औरंगाबाद) : तालुक्यातील खिर्डी गावच्या शासकीय पाणीपुरवठ्याच्या विहिरीजवळ विहीर पुनर्भरण कार्यक्रम राबविल्याने खिर्डी गाव गेल्या पाच वर्षांपासून टँकरमुक्त झाले असून आजही गावास एक दिवसाआड मुबलक पाणीपुरवठा केला जात आहे.खिर्डी गावास मावसाळा येथील रंगमहाल तलावातील शासकीय पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीतून पाणीपुरवठा करण्यात येतो. गेल्या अनेक वर्षांपासून अत्यल्प पावसामुळे गावास तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. परंतु ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या अथक परिश्रमामुळे मावसाळा रंगमहाल तलाव परिसरातील विहिरीजवळ विहिर पुनर्भरण करण्यात आले. त्याचबरोबर विहिरीजवळ खड्डे खोदून या खड्ड्यात दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या जामदरी तलावातून पाणी आणून ते पाणी परिसरातील खड्ड्यात सोडल्याने विहिरीच्या पाणीपातळीत वाढ झाली व गेल्या पाच वर्षांपासून विहिरीस भरपूर पाणी असल्याने ग्रामस्थांना ते एक दिवसाआड मुबलक प्रमाणात पुरविण्यात येत आहे. यंदा पाऊस झाला नाही तरी या शासकीय पाणीपुरवठा विहिरीस मुबलक पाणी असल्याचे सरपंच कृष्णा चव्हाण व प्रगतशील शेतकरी दत्तू धोत्रे यांनी सांगितले. गेल्या वर्षी ग्रामपंचायतीने शासकीय पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळ पाच लाख रुपये खर्च करून दोन बुडक्या विहिरी खोदल्या तसेच त्यात आडवे बोअर घेतले. त्यामुळे या बुडक्या विहिरीचे पाणी विहीर पुनर्भरण कार्यक्रमास वापरून गावकऱ्यांना नळाद्वारे एकदिवसाआड पुरविले जात आहे. त्यामुळे खिर्डी गाव गेल्या पाच वर्षांपासून टँकरमुक्त झाले आहे. 

टॅग्स :water shortageपाणीकपातAurangabadऔरंगाबादdroughtदुष्काळ