शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय पथकाकडून ‘खिचडी’ची तपासणी

By admin | Updated: December 4, 2014 00:53 IST

उस्मानाबाद : खिचडीत लेंढ्या निघाल्या...तांदळामध्ये अळ्या...पालेभाज्यांचा वापर नाही...अशा नानाविध तक्रारी ग्रामस्थांतून होत होत्या.

उस्मानाबाद : खिचडीत लेंढ्या निघाल्या...तांदळामध्ये अळ्या...पालेभाज्यांचा वापर नाही...अशा नानाविध तक्रारी ग्रामस्थांतून होत होत्या. शासनाचे पोषण आहारावर कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाही शाळकरी विद्यार्थ्यांना बेचव खिचडी खावी लागत असल्याची ओरडही होत होती. याच पार्श्वभूमीवर ‘खिचडी’ची तपासणी करण्यासाठी राज्यस्तरीय पथक दोन दिवसांपासून जिल्ह्यात शाळांवर जावून चौकशी करीत आहेत. त्यामुळे आता ‘बेचव’ खिचडीची पोलखोल होण्याच्या शक्यतेने पोषण आहाराच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढावी, पर्यायाने विद्यार्थ्यांना शाळेचा लळा लागावा, यासाठी शासनाच्या वतीने पोषण आहार ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना खिचडी पुरविली जाते. सुरूवातीचे काही दिवस ही योजना उत्तम पद्धतीने सुरू होती. परंतु, कालांतराने विशेषत: पोषण आहाराच्या दर्जाबाबात तक्रारी वाढू लागल्या. तसेच पोषण आहार शिजविताणा स्वच्छता पाळली जात नसल्याबाबतही ओरड होत होती. अनेकवेळा शिजविलेल्या खिचडीमध्ये लेंढ्या निघाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. खिचडीमध्ये निश्चित केलेल्या मेनुप्रमाणे पालेभाज्या वापरल्या जात नसल्याची ओरडही पालकांतून सातत्याने होते.दरम्यान, पोषण आहाराबाबत सातत्याने पालकांतून होत असलेली ओरड लक्षात घेवून शासनाने सदरील पोषण आहाराची (खिचडी) चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यामध्ये राज्यस्तरीय पथक मंगळवारी दाखल झाले आहे. या पथकाचे प्रमुख शिक्षक संचालक आहेत. पथकामध्ये राज्यस्तरावरील चार आणि जिल्ह्यातील चार सदस्यांचा समावेश आहे. दोन दिवसांमध्ये भूम, परंडा, लोहारा, उमरगा आणि तुळजापूर या तालुक्यांतील जवळपास प्रत्येकी तीन याप्रमाणे शाळांची तपासणी करण्यात आली आहे. यावेळी खिचडीची गुणवत्ता, स्वच्छता यासोबतच विद्यार्थ्यांची गुणवत्ताही तपासली जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. पथकाच्या अचानक तपासणीमुळे पोषण आहाराच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. (प्रतिनिधी)