६१ हजार हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या
By Admin | Updated: July 22, 2016 00:31 IST2016-07-22T00:20:06+5:302016-07-22T00:31:42+5:30
जाफराबाद : तालुक्यातील ६६ हजार पेरणी लायक क्षेत्रा पैकी ६१ हजार ९७६ हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून, शेतकरी मशागतीच्या कामाला लागला आहे.

६१ हजार हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या
जाफराबाद : तालुक्यातील ६६ हजार पेरणी लायक क्षेत्रा पैकी ६१ हजार ९७६ हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून, शेतकरी मशागतीच्या कामाला लागला आहे. कृषी विभागाच्या अहवाला नुसार चालू परिस्थितीमध्ये पिके समाधानकारक असले तरी पुढील पिकांकरिता मोठ्या पावसाची शेतकरी प्रतीक्षा करीत आहे. गेल्या दोन मिहन्यातील पावसाची सरासरी पाहता ती कमी आहे. अतापर्यंत फक्त १९७ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. ती सरासरीपेक्षा ६० मी. मी. कमी आहे.
जाफराबाद तालुक्यात शेती व्यवसायाला पूरक उद्योग धंदे नाही त्यामुळे तालुक्याचे जीवनमान शेतीवर अवलंबून आहे.
मागील दोन वर्षांची दुष्काळी परिस्थिती ओढवल्याने शेतकरी भयभीत आहे. गेल्या आठवड्यातील रिमझिम पाऊस सोडल्यास पुर्णा, धामना, खेळणा, या सारख्या नद्या अजून कोरड्या ठाक आहे.पिके सलाईनवर टिकून आहे.
माहोरा, वरु ड बु, या मंडळा मध्ये सर्वात कमी पाऊस आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे.
या भागात आजूनही पाण्याचे टँकर सुरु आहे. अशीच
परिस्थिती कायम राहिल्यास पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. (वार्ताहर)