पावसाअभावी खरीप कोमेजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:03 IST2017-08-11T00:03:49+5:302017-08-11T00:03:49+5:30
पावसाने महिनाभरापासून दडी मारल्याने जिल्ह्यातील खरीप पिकांची स्थिती अत्यंत नाजूक बनली आहे

पावसाअभावी खरीप कोमेजले
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पावसाने महिनाभरापासून दडी मारल्याने जिल्ह्यातील खरीप पिकांची स्थिती अत्यंत नाजूक बनली आहे. आठवडाभरात पाऊस न झाल्यास कपाशीसह सोयाबीन, तूर, मूग ही पिके पूर्णत: हातची जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी गुरुवारी विरेगाव व पाचन वडगाव मंडळातील गावांमध्ये जाऊन पीक परिस्थितीचा आढावा घेतला.
तालुक्यातील विरेगाव व पाचन वडगाव या मंडळातील वडीवाडी, कारला, कोडी, माली पिंपळगाव, हिस्वन, खणेपुरी, हातवण, भाटेपुरी इ. गावांमध्ये सुरुवातीपासून कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या भागातील बहुतांश पिके सुकली आहेत. काही ठिकाणी शेतकºयांनी सुकलेल्या पिकांमध्ये जनावरे सोडली आहेत, तर काहींनी सोयाबीन पीक मोडले आहे. त्यामुळे या भागातील पिकांचा पंचनामा करण्याची मागणी परिसरातील शेतकºयांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. याची दखल घेत जिल्हाधिकाºयांनी शेतात जाऊन स्थितीचा आढावा घेतला. परिसरातील शेतकºयांशी चर्चा केली. मागील अनेक दिवसांपासून पाऊस नसल्याने बरीच पिके वाया गेली आहेत.
आठवडाभरात पाऊस न झाल्यास कपाशीही वाया जाण्याची शक्यता असून, या पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव वाढल्याचे शेतकºयांनी जोंधळे यांच्या निदर्शनास आणून दिले. परिसरातील किती शेतकºयांनी पीकविमा भरला, याबाबतची माहिती जिल्हाधिकाºयांनी जाणून घेतली. दोन्ही मंडळातील गावांना पिण्यासाठी पाणी व जनावरांसाठी चारा याबाबत तातडीने उपाययोजना करण्यात येईल. त्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी संबंधित अधिकाºयांना दिल्या.
या वेळी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी दशरथ तांभाळे, तहसीलदार विपीन पाटील, नायब तहसीलदार संदीप ढाकणे, तालुका कृषी अधिकारी राम रोडगे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पंडित भुतेकर, गोविंद कुटे यांच्यासह शेतकºयांची उपस्थिती होती.