शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

खरिपाच्या पेरण्या केवळ २२ टक्के

By admin | Updated: July 20, 2014 00:25 IST

सेनगाव : तालुक्यात वरुणराजाने पावसाळ्याच्या प्रारंभीपासूनच दडी मारल्याने गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे.

सेनगाव : तालुक्यात वरुणराजाने पावसाळ्याच्या प्रारंभीपासूनच दडी मारल्याने गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. २० जुलैैपर्यंत दमदार पाऊस झाला नाही तर सोयाबीन, कापूस पेरणीची निर्धारित वेळही हातची जाण्याची शक्यता आहे. अत्यल्प पावसावर केवळ २२ टक्के पेरण्या झाल्याची कृषी विभागाची माहिती आहे.तालुक्यातील सर्वच भागात पावसाने दडी मारली आहे. १५ जुलैैपर्यंत केवळ ५६ मि.मी. पाऊस झाला असून सर्वसामान्यपणे ७५ मि.मी. पावसाच्या पुढे पेरणी करणे गरजेचे आहे; परंतु तालुक्यातील सवना, गोरेगाव, ताकतोडा, धनगरवाडी, पळशी, आजेगाव, पुसेगाव, पार्डी पोहकर, वरुड समद, आडोळ या भागातील शेतकऱ्यांनी अत्यल्प पावसावरच पेरणी केली आहे. तर सेनगाव, पानकनेरगाव, कवठा, जयपूर, कोळसा, वरुड चक्रपान, हत्ता, साखरा, कापडसिंगी, येलदरी, ब्रम्हवाडी या भागात भीजपावसाव्यतिरिक्त एकही दमदार पाऊस झाला नसल्याने संपूर्ण पेरण्या रखडल्या आहेत. तालुक्यात कृषी विभागाच्या माहितीनुसार केवळ २२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. तालुक्यात ८९ हजार हेक्टर लागवडीयोग्य क्षेत्र असून प्रामुख्याने सोयाबीन, कापूस या पिकांना शेतकऱ्यांची पसंती आहे. या दोन्ही पिकांचा पेरणी हंगामाचा अवधी जास्तीत जास्त २० जुलैैपर्यंत असल्याची माहिती कृषी विभागाचे अधिकारी देत आहेत. २० जुलैै उजाडला तरी तालुक्यात एकही पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने सोयाबीन, कापूस पेरणी करता येईल का? या संकटात शेतकरी सापडला आहे. चाऱ्याचा प्रश्न तीव्र झाला असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जुलैै महिना संपत आला असून पेरणी झाली नसल्याने संपूर्ण शेत शिवार ओसाड दिसत आहे. (वार्ताहर)शेतशिवार ओसाडसेनगाव तालुक्यातील सर्वच भागात पावसाने दडी मारली आहे. १५ जुलैैपर्यंत केवळ ५६ मि.मी. पाऊस झाला असून पेरणीसाठी सर्वसामान्यपणे ७५ मि.मी. पावसाची आवश्यकता असते. पेरणीयोग्य पावसाची अजूनही प्रतीक्षा सुरूच असल्याने शेतीकामे रखडली आहेत. सवना, गोरेगाव, ताकतोडा, धनगरवाडी, पळशी, आजेगाव, पुसेगाव, पार्डी पोहकर, वरुड समद, आडोळ या भागातील शेतकऱ्यांनी जोखीम घेत अत्यल्प पावसावरच पेरणी केली आहे.तर सेनगाव, पानकनेरगाव, कवठा, जयपूर, कोळसा, वरुड चक्रपान, हत्ता, साखरा, कापडसिंगी, येलदरी, ब्रम्हवाडी या भागात भीज पावसाव्यतिरिक्त एकदाही दमदार पाऊस झालेला नाही. कृषी विभागाच्या माहितीनुसार तालुक्यात केवळ २२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. तालुक्यात ८९ हजार हेक्टर लागवडयोग्य क्षेत्र असून प्रामुख्याने सोयाबीन, कापूस या पिकांना शेतकऱ्यांची पसंती आहे.