खरिपाच्या पेरण्या केवळ २२ टक्के
By Admin | Updated: July 20, 2014 00:25 IST2014-07-19T23:47:21+5:302014-07-20T00:25:56+5:30
सेनगाव : तालुक्यात वरुणराजाने पावसाळ्याच्या प्रारंभीपासूनच दडी मारल्याने गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे.
खरिपाच्या पेरण्या केवळ २२ टक्के
सेनगाव : तालुक्यात वरुणराजाने पावसाळ्याच्या प्रारंभीपासूनच दडी मारल्याने गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. २० जुलैैपर्यंत दमदार पाऊस झाला नाही तर सोयाबीन, कापूस पेरणीची निर्धारित वेळही हातची जाण्याची शक्यता आहे. अत्यल्प पावसावर केवळ २२ टक्के पेरण्या झाल्याची कृषी विभागाची माहिती आहे.
तालुक्यातील सर्वच भागात पावसाने दडी मारली आहे. १५ जुलैैपर्यंत केवळ ५६ मि.मी. पाऊस झाला असून सर्वसामान्यपणे ७५ मि.मी. पावसाच्या पुढे पेरणी करणे गरजेचे आहे; परंतु तालुक्यातील सवना, गोरेगाव, ताकतोडा, धनगरवाडी, पळशी, आजेगाव, पुसेगाव, पार्डी पोहकर, वरुड समद, आडोळ या भागातील शेतकऱ्यांनी अत्यल्प पावसावरच पेरणी केली आहे. तर सेनगाव, पानकनेरगाव, कवठा, जयपूर, कोळसा, वरुड चक्रपान, हत्ता, साखरा, कापडसिंगी, येलदरी, ब्रम्हवाडी या भागात भीजपावसाव्यतिरिक्त एकही दमदार पाऊस झाला नसल्याने संपूर्ण पेरण्या रखडल्या आहेत. तालुक्यात कृषी विभागाच्या माहितीनुसार केवळ २२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. तालुक्यात ८९ हजार हेक्टर लागवडीयोग्य क्षेत्र असून प्रामुख्याने सोयाबीन, कापूस या पिकांना शेतकऱ्यांची पसंती आहे. या दोन्ही पिकांचा पेरणी हंगामाचा अवधी जास्तीत जास्त २० जुलैैपर्यंत असल्याची माहिती कृषी विभागाचे अधिकारी देत आहेत.
२० जुलैै उजाडला तरी तालुक्यात एकही पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने सोयाबीन, कापूस पेरणी करता येईल का? या संकटात शेतकरी सापडला आहे. चाऱ्याचा प्रश्न तीव्र झाला असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जुलैै महिना संपत आला असून पेरणी झाली नसल्याने संपूर्ण शेत शिवार ओसाड दिसत आहे. (वार्ताहर)
शेतशिवार ओसाड
सेनगाव तालुक्यातील सर्वच भागात पावसाने दडी मारली आहे. १५ जुलैैपर्यंत केवळ ५६ मि.मी. पाऊस झाला असून पेरणीसाठी सर्वसामान्यपणे ७५ मि.मी. पावसाची आवश्यकता असते.
पेरणीयोग्य पावसाची अजूनही प्रतीक्षा सुरूच असल्याने शेतीकामे रखडली आहेत.
सवना, गोरेगाव, ताकतोडा, धनगरवाडी, पळशी, आजेगाव, पुसेगाव, पार्डी पोहकर, वरुड समद, आडोळ या भागातील शेतकऱ्यांनी जोखीम घेत अत्यल्प पावसावरच पेरणी केली आहे.
तर सेनगाव, पानकनेरगाव, कवठा, जयपूर, कोळसा, वरुड चक्रपान, हत्ता, साखरा, कापडसिंगी, येलदरी, ब्रम्हवाडी या भागात भीज पावसाव्यतिरिक्त एकदाही दमदार पाऊस झालेला नाही.
कृषी विभागाच्या माहितीनुसार तालुक्यात केवळ २२ टक्के पेरण्या झाल्या आहेत.
तालुक्यात ८९ हजार हेक्टर लागवडयोग्य क्षेत्र असून प्रामुख्याने सोयाबीन, कापूस या पिकांना शेतकऱ्यांची पसंती आहे.