खरिपाचे उत्पादन ५० टक्क्यांनी घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:39 IST2017-08-12T00:39:54+5:302017-08-12T00:39:54+5:30

जिल्ह्यात १७ जूननंतर मोठा पाऊस झालेला नाही. ढगाळ वातावरण व हलक्या पावसामुळे पिकांना कसेबसे जीवनदान मिळाले. मात्र, आता कडक ऊन पडण्यास सुरुवात झाली

 Kharif production will fall by 50 percent | खरिपाचे उत्पादन ५० टक्क्यांनी घटणार

खरिपाचे उत्पादन ५० टक्क्यांनी घटणार

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यात १७ जूननंतर मोठा पाऊस झालेला नाही. ढगाळ वातावरण व हलक्या पावसामुळे पिकांना कसेबसे जीवनदान मिळाले. मात्र, आता कडक ऊन पडण्यास सुरुवात झाली असून, जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. परिणामी पिके सुकली आहेत. याचा थेट परिणाम उत्पादनावर होणार आहे. कृषी विभागाच्या ताज्या अहवालानुसार खरिपाचे उत्पादन ५० टक्क्यांपर्यंत घटण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील पीक परिस्थिती व हवामानाचा १० आॅगस्टपर्यंतचा अहवाल कृषी विभागने तयार केला आहे. जालना, अंबड, घनसावंगी व बदनापूर तालुक्यातील पिकांची स्थिती पावसाअभावी अत्यंत बिकट झाली आहे. आठवडाभरापूर्वी चांगल्या स्थितीत असलेली भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील पिके सुकली आहेत. पाऊस नसल्याचा सर्वाधिक फटका मूग व उडीद पिकास बसला आहे. उडिदाचे पीक फुलोºयाच्या अवस्थेत असून, मूग शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. दोन्ही पिकांचे उत्पादन पन्नास टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे. तुरीच्या ५३ हजार ६७८ हेक्टवरील पिकाची वाढ खुंटली आहे. सरासरीच्या १६१.३ हेक्टरवर पेरणी झालेले सोयाबीन फुलोºयाच्या अवस्थेत असून, त्यावर उंट अळी व चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव आहे. तूर व सोयाबीनचे उत्पादन २५ ते ५० टक्के घट अपेक्षित आहे. बागायती कापसाचे पीक वाढीच्या अवस्थेत असून, कोरडवाहू कापसाची वाढ खुंटली आहे. ठिबकच्या मदतीने विहिरीतील अल्प पाण्यावर कापूस पीक जगविण्यासाठी शेतकºयांची धडपट पाहावला मिळत आहे. बाजरी व मका पिकाची स्थिती अत्यंत नाजूक आहे. यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे शेतकºयांनी मोठ्या उत्साहाने पेरणी व लागवडीचे कामे सुरू केली. सुरुवातीला काही भागात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने मशागतींच्या कामांना वेग आला होता. शेतकºयांनी आतापर्यंत बी-बियाणे, खते, औषधी यावर मोठा खर्च केला आहे. मात्र, पावसाने ओढ दिल्याने हा सर्व खर्च वाया जाण्याची शक्यता आहे.

Web Title:  Kharif production will fall by 50 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.