खरिपाच्या उत्पादनात होणार घट !
By Admin | Updated: August 11, 2014 01:53 IST2014-08-11T00:56:46+5:302014-08-11T01:53:16+5:30
जेवळी : पावसाने ओढ दिल्यामुळे जी काही पिके उगवून आली आहेत. त्यांचीही उत्पादन क्षमता घटणार आहे. तसेच सोयाबीनसारख्या पिकावर पाने

खरिपाच्या उत्पादनात होणार घट !
जेवळी : पावसाने ओढ दिल्यामुळे जी काही पिके उगवून आली आहेत. त्यांचीही उत्पादन क्षमता घटणार आहे. तसेच सोयाबीनसारख्या पिकावर पाने कुरतडणाऱ्या आणि उंट आळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसते.
यावर्षी वेळेपेक्षा उशिराने पाऊस पडला. तोही केवळ पेरणी करण्यापुरताच. त्यानंतर पावसाने पाठ फिरविली आहे. परिणामी सर्वच पिके माना टाकू लागली आहेत. नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन, उडीद व मुग ही पिके हातातून गेल्यात जमा आहेत. आठवडाभरात पाऊस झाला तरी अपेक्षित उत्पादन मिळणार नाही. रिमझिम स्वरुपाच्या पावसावर पीके बऱ्यापैकी आली होती. शेतकऱ्यांनी कोळपणी, खुरपणी आदी कामे उरकली होती. मात्र सध्या पावसानेच ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांनी खर्चिक कामे थांबविली आहेत. आॅगस्ट महिन्यामध्ये मजुरांची टंचाई असते. परंतु यावर्षी बहुतेक मजूर वर्ग बसूनच आहेत. पिके येतील का नाही याची शाश्वती नसल्याने खर्च करायचा तरी कोठून? अशी प्रतिक्रिया भोसगा येथील शेतकरी अनिल बिराजदार यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)