शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

पावसाअभावी खरीप गेले, आता अवकाळीने रब्बीचे नुकसान; मराठवाड्यात १०७ मंडळात अतिवृष्टी

By विकास राऊत | Updated: November 28, 2023 11:36 IST

मराठवाड्यातील २ हजार १४० गावांतील रब्बी पिकांवर अवकाळी संकट

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात रविवारी रात्रीपासून आज पहाटेपर्यंत अवकाळी पावसाने दाणादाण उडवून दिली. अतिवृष्टीमुळे रबी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरत्या वर्षांत कमी पावसामुळे सहा जिल्ह्यांतील तर दोन जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे खरीप पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले. रबी हंगामाच्या पेरण्यांचा अंतिम टप्पा असतानाच अवकाळी पावसाने पिकांचे माती केली. विभागातील १०७ मंडळातील सुमारे २ हजार १४० गावांतील रबी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विभागीय प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनाम्यानंतर वस्तुस्थिती समाेर येईल. विभागात सुमारे ८ हजार ५५० गावे असून ४२५ मंडळ आहेत. त्यातील १०७ मंडळे रविवार २६ रोजी झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्यात आली.

छत्रपती संभाजीनगर : ६४० गावांत नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३२ मंडळात पावसाने थैमान घातले. ६४० गावांमध्ये रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात उस्मानपुरा ७४ मि.मी., भावसिंगपुरा ८५ मि.मी., कांचनवाडी ७९ मि.मी., चौका ८६ मि.मी., कचनेर ६८ मि.मी., पंढरपूर ७३.७५ मि.मी., अडूळ ९३.५० मि.मी., बिडकीन ६८.२५ मि.मी., पाचोड ६८ मि.मी., मांजरी ६८.२५. मि.मी., भेंडाळा ६९ मि.मी., तुर्काबाद ७८.५० मि.मी., वाळुज ७३.७५ मि.मी., डोणगाव ९९.७५ मि.मी., असेगाव ६७.२५ मि.मी., शिवूर ८७.५० मि.मी., गारज ७६ मि.मी., महालगाव ७०.७५ मि.मी., जानेफळ ६८ मि.मी., कन्नड ६७ मि.मी., चाफानेर ६७ मि.मी., देवगाव ७२.२५ मि.मी., पिशोर ८६.२५ मि.मी., नाचनवेल ७९.५० मि.मी., चिंचोली लिंबाजी ६६.७५ मि.मी., वेरुळ १०७.५० मि.मी., सुलतानपूर १०३.७५ मि.मी., बाजारसावंगी ८६ मि.मी., गोळेगाव ६६.५० मि.मी., आमठाण ७३.२५ मि.मी., बोरगाव ७७.२५ मि.मी. तर फुलंब्रीमध्ये ८९.५० मि.मी. पावसाची नोंद झाली.

जालना : ५४० गावांना अतिवृष्टीचा दणका जालना जिल्ह्यात २७ मंडळांतील ५४० गावांना अवकाळी पावसाचा दणका बसला. त्यात भोकरदन ९५.७५ मि.मी., पिंपळगाव ७२.५० मि.मी., केदरखेडा ७५.७५ मि.मी., जाफ्राबाद ७१.७५ मि.मी., कुंभारजारा ७७.७५ मि.मी., टेंभूर्णी ८०.५० मि.मी., जालना शहर १०४.२५ मि.मी., वाघरुळ १३२.२५ मि.मी., नेर ७६.२५ मि.मी., शेवाळी ८१.५० मि.मी., रामनगर ७८.५० मि.मी., पाचनवड ७८.५० मि.मी., जामखेड ७२.५० मि.मी., रोहिलगड ८१.५० मि.मी., गोंदी ७० मि.मी., वडीगोद्री ७२.७५ मि.मी., वाटूर ६८.७५ मि.मी.,बदनापूर ९३.२५ मि.मी., शेलगाव १३२ मि.मी., बावणे ९२.५० मि.मी., रोशनगाव ९०.५० मि.मी., तिर्थपूरी ९०.२५ मि.मी., कु. पिंपळगाव ७२.५० मि.मी., अंतरवाली ७१.७५ मि.मी., तळणी ७४.२५ मि.मी., ढोकसाळ ७७.२५ मि.मी., पांगरी ८३.५० मि.मी. तर तलवाडा मंडळात ७५.२५ मि.मी. पावसाची नोंद झाली.

परभणीत : ४६० गावांना अवकाळीचा फटकापरभणी जिल्ह्यातील २३ मंडळातील ४६० गावांतील रबी हंगामाला अवकाळीचा फटका बसला आहे. त्यात परभणी १०२.५० मि.मी., जांब ७०.७५ मि.मी., झरी ७२ मि.मी., सिंगनापूर ७६.२५ मि.मी., पिंगळी ७६ मि.मी., केसापुरी ७२.५० मि.मी., जिंतूर १२९.७५ मि.मी., संगावी ८४ मि.मी., बामणी ८२ मि.मी., बोरी ८८.७५ मि.मी., अडगाव १०२.७५ मि.मी., चारठाण ७५.५० मि.मी., वाघी १००.७५ मि.मी., दुधगाव ८३.२५ मि.मी., पूर्णा ९७.७५ मि.मी., तडकळस ९१.७५ मि.मी., लिमाळा ६८.२५ मि.मी., कंठेश्वर ७५ मि.मी., चुडावा ९४.५० मि.मी., देऊळगाव ७६.७५ मि.मी., कुपटा ९४.५० मि.मी., कोलहा ७६.७५ मि.मी. तर तडबोरगाव मंडळात ६९ मि.मी. पावसाची नोंद झाली.

हिंगोलीत २४० तर बीडमध्ये २० गावांत नुकसानहिंगोली जिल्ह्यात १२ मंडळातील २४० गावांत अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. त्यात हिंगोली ७२.२५ मि.मी., बासंमबा ७०.२५ मि.मी., दिग्रस ८५ मि.मी., माळहिवरा ६६ मि.मी., कळमनुरी ७३.२५ मि.मी., वाकोडी ८३.७५ मि.मी., नांनदापूर ७९.२५ मि.मी., हत्ता ७४ मि.मी., औंढा ८३.५० मि.मी., येहाळेगाव ८७ मि.मी., सालना ८३ मि.मी. तर जावळा मंडळात ८७.५० मि.मी. पाऊस झाला. बीड जिल्ह्यात तलवाडा मंडळात ७५.२५ मि.मी. पाऊस झाला.

नांदेड जिल्ह्यात २४० गावांना तडाखानांदेड जिल्ह्यातील १२ मंडळातील २४० गावांतील रबी पिकांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला. यात नांदेड शहर ६८ मि.मी., लिंम्बगाव ९९ मि.मी., तारोडा ८२.२५ मि.मी., नाळेश्वर ७०.७५ मि.मी., उस्माननगर ७६.२५ मि.मी., सोनखेड ७६.२५ मि.मी., शेवडी ७४ मि.मी., कालमबार ७६.२५ मि.मी., ताम्सा ६५.२५ मि.मी., अर्धापूर ७७.५० मि.मी. तर दाभाड मंडळात ६९ मि.मी. पावसाची नोंद झाली.

टॅग्स :RainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादNandedनांदेड