औरंगाबाद : सातारा खंडोबा मंदिराचा जीर्णोद्वार हा अहिल्यादेवी होळकर यांच्या हस्ते झालेला असून, त्यांच्या काळात राहिलेल्या निर्माण वास्तू व इतर कामांसाठी १ कोटी १३ लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. पुरातत्व विभाग त्यासाठी ठेकेदारांकडून आॅनलाईन निविदा नवीन वर्षात किंवा मंगळवार-बुधवारपासून मागविणार आहे, अशी माहिती पुरातत्व विभागाकडून मिळाली आहे. सातारा खंडोबा मंदिरावर प्रदूषणाचा परिणाम झाला असून, बदलत्या वातावरणात जून महिन्यात झालेल्या जोरदार पावसाने दीपमाळीचा दिवा निखळून मंदिराच्या समोरील प्रवेशद्वारात पडला. त्यावेळी कोणीही त्या ठिकाणी नव्हते, त्यामुळे अनर्थ टळला.मंदिराच्या बांधकामात वापरलेले दगड, चिरा, विविध राज्यांतून आणलेल्या आहेत. पुरातत्व विभाग मंदिराचा लूक शक्यतो बदलू नये; परंतु योग्य व खात्रीलायक दुरुस्ती व्हावी यावर जोर देत आहे. नियमानुसार पुरातन ठेवा आहे, हा वारसा पुढेही येणाऱ्या पिढीला कायम प्रेरणादायी ठरावा असा दंडकच आहे. सातारा खंडोबा मंदिरासह इतरही १० ठिकाणांचे टेंडर मागविण्यात येणार आहे. गुणवत्तापूर्वक काम करणारे आणि पुरातत्वच्या लिस्टमध्ये असलेल्या टेंडरलाच ई-टेंडरमध्ये अर्ज दाखल करता येतात, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. शिखर, सभामंडप, दीपमाळ यांसह कामाचा समावेश आहे. मंदिर चौथऱ्याच्या दगडांची झीज होत असून, त्याची झीज रोखण्याचे काम केले जाणार आहे. मंदिराचा लूक मूळ स्थानी ठेवून काही थोडेफार बदल होतील; परंतु सर्व जडणघडणीवर पुरातत्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून राहतील. असे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
खंडोबा मंदिर व दीपमाळीसाठी आॅनलाईन निविदा मागविणार
By admin | Updated: December 28, 2015 00:27 IST