खामसवाडी गावातील ‘तो’ गोंधळ दारूच्या नशेत

By Admin | Updated: October 17, 2014 00:27 IST2014-10-17T00:19:23+5:302014-10-17T00:27:16+5:30

उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास मतदान यंत्र पळविण्याचा प्रयत्न झाला नसून, एका तळीरामाने बससमोर गोंधळ घातला

Khamaswadi village 'he' messed up drunk alcohol | खामसवाडी गावातील ‘तो’ गोंधळ दारूच्या नशेत

खामसवाडी गावातील ‘तो’ गोंधळ दारूच्या नशेत


उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास मतदान यंत्र पळविण्याचा प्रयत्न झाला नसून, एका तळीरामाने बससमोर गोंधळ घातला होता़ गोंधळ घालणाऱ्या त्या इसमाविरूध्द शिराढोण पोलिस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कळंबचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिलवंत ढवळे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे़
उस्मानाबाद-कळंब तालुक्यातील खामसवाडी गावात बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर रात्रीच्या सुमारास मतदान यंत्र पेट्यांमध्ये घालून बसमधून उस्मानाबादकडे आणण्यात येत होत्या़ त्यावेळी बसमध्ये बिघाड झाल्याने ती गावात थांबली होती़ त्यावेळी बसमधील मतदान यंत्रणेच्या पेट्या पळविण्याचा प्रयत्न झाल्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते़ या वृत्ताची दखल घेत पोलिस प्रशासनाने घडलेल्या प्रकरणाच्या चौकशीअंती प्रसिध्दीपत्रक काढले आहे़ त्यात नमूद केले की, मतदान प्रक्रिया झाल्यानंतर मतदान यंत्रणेसह पोलिस कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांना घेवून येणाऱ्या बसचे (क्ऱएम़एच़२०-बी़एल़०७८७) फोकस (हेडलाईट) बंद पडल्याने गावातील शाळेजवळ थांबविण्यात आली होती़ त्यावेळी तेथे दारू पिवून आलेल्या चंद्रकांत उर्फ पप्पू बाळासाहेब पाटील (वय-३२ राख़ामसवाडी) हा बससमोर आरडाओरड करीत गोंधळ घालत होता़ त्यावेळी क्षेत्रीय अधिकारी तथा कळंब येथील सामाजिक वनिकरण विभागातीलचे कर्मचारी अशोक दशरथराव घुले यांनी दुसरी बस मागवून घेतली़ दुसरी बस (क्ऱ एम़ एच़१४/बी़टी़२२६२) आल्यानंतर मतदान यंत्रे, कर्मचारी घेवून उस्मानाबादकडे गेली़
त्यानंतर शिराढोण पोलिस ठाण्याचे सपोनि पवार यांनी चंद्रकांत पाटील यास ताब्यात घेवून शिराढोण प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणी केली़ त्यावेळी पाटील यानी मद्यार्क प्राषण केल्याचा अहवाल आला़ त्या अहवालानंतर पोना सुधीर तुगावकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाटील याच्याविरूध्द शिराढोण पोलिस ठाण्यात प्रोग़ु़ऱनं़ ६४/१४ कलम ८५ (१) महाराष्ट्र दारूबंदी कायदा सह कलम ११२/ ११७ महाराष्ट्र पोलिस कायद्याप्रमाणे बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास अटक करण्यात आली आहे़ तसेच प्रभाकर शेळके यांनी जामीन दिल्याने चंद्रकांत पाटील याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे़
त्यामुळे ढोकी येथे मतदान यंत्रणाच्या पेट्या पळविण्याचा प्रयत्न झाला नसून, तेथे तळीरामाने गोंधळ घातला असल्याचेही ढवळे यांनी पत्रकात म्हटले आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Khamaswadi village 'he' messed up drunk alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.