खाम नदी पात्रातील १२ घरे पाडली
By Admin | Updated: May 13, 2016 00:09 IST2016-05-13T00:03:45+5:302016-05-13T00:09:38+5:30
औरंगाबाद : खाम नदीपात्रातील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम दुसऱ्या दिवशीही सुरूच होती. गुरुवारी १२ घरे पाडण्यात आली. जहांगीर कॉलनी, चाऊस कॉलनी, एकतानगर भागात कारवाई करण्यात आली.

खाम नदी पात्रातील १२ घरे पाडली
औरंगाबाद : खाम नदीपात्रातील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम दुसऱ्या दिवशीही सुरूच होती. गुरुवारी १२ घरे पाडण्यात आली. जहांगीर कॉलनी, चाऊस कॉलनी, एकतानगर भागात कारवाई करण्यात आली. यावेळी एमआयएमचे नगरसेवक अय्युब खान यांनी उपायुक्त रवींद्र निकम यांच्यासोबत वाद घालून कारवाईला विरोध केला.
खाम नदीपात्रातील ३० मीटरपर्यंतची अतिक्रमणे हटविण्यासाठी काल बुधवारपासून मनपा प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. जहांगीर कॉलनी भागातील ५५ मालमत्ता काल जमीनदोस्त करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर गुरुवारी सकाळी १० वाजेपासून प्रशासनाने उर्वरित अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली. जहांगीर कॉलनी परिसरात असलेली किरकोळ अतिक्रमणे हटविल्यानंतर मोहीम चाऊस कॉलनी भागात पोहोचली. दुपारी पक्क्या घरांचे बांधकाम तोडण्यात येत असताना एमआयएमचे नगरसेवक अय्युब खान तेथे पोहोचले. डी. एड. कॉलेजची संरक्षक भिंत, शौचालये हटविण्यास त्यांनी विरोध केला. उपायुक्त रवींद्र निकम यांनी कारवाईला विरोध करू नका, असे आवाहन केले. मात्र अय्युब यांनी मोहीम बंद पाडण्याचा प्रयत्न केला.
अय्युब खान यांच्या विरोधानंतर एमआयएमचे आ. इम्तियाज जलील चाऊस कॉलनीत आले. त्यांनी रवींद्र निकम यांची भेट घेऊन कारवाईला आमचा विरोध नाही, मात्र ज्या नागरिकांचे शंभर टक्के घरे जात आहेत, त्यांचे पुनर्वसन करा, अशा सूचना आमदार जलील यांनी केल्या.