शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
2
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
3
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
4
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
5
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
6
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
7
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
8
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
9
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
10
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
11
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
12
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
13
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
14
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
15
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
16
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
18
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
19
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
20
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!

खाकी गणवेश, परवाना अन् बिल्ला पाहिजेच; रिक्षाचालकांना पोलिसांचा तीन दिवसांचा अल्टीमेटम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 17:20 IST

सहायक आयुक्तांनी बैठक घेऊन दिली तंबी

छत्रपती संभाजीनगर : प्रत्येक रिक्षाचालक खाकी गणवेशात दिसलाच पाहिजे. सोबत रिक्षाचे कागदपत्रे, चालक परवाना व छातीवर बिल्ला असला पाहिजे. तीन दिवसांचा अल्टीमेटम देतो, त्यानंतर कठोर कारवाईची मोहीम सुरू केली जाईल, बेशिस्तपणा सहन केला जाणार नाही, अशी तंबीच वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त धनंजय पाटील यांनी दिली.

सोमवारी दुपारी वाहतूक शाखेच्या कार्यालयात शहरातील रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची पाटील यांनी बैठक बोलावली होती. गेल्या अनेक दिवसांपासून बेशिस्त, गुंड प्रवत्तीच्या रिक्षाचालकांमुळे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. गणवेश नसणे, मूळ मालकाऐवजी चौथीच व्यक्ती रिक्षा चालवते, नादुरुस्त रिक्षातून प्रवाशांची वाहतूक, गाणे वाजवत सुसाट हुल देत जाण्याचे प्रकार वाढले आहेत. याची दखल घेत पाटील यांनी तुम्हाला नियम पाळावे लागतील, अशी तंबी देत कठोर कारवाईचा इशारा दिला. यावेळी निरीक्षक अमोल देवकर, राजेश मयेकर, सचिन इंगोले, विवेक जाधव यांची उपस्थिती होती.

परवानाधारकानेच रिक्षा चालवावीसध्या रिक्षा विकत घेतल्यानंतर ती पुढे कमिशनवर इतरांना चालवण्यासाठी दिली जाते. असे दोन, तीन चालक बदलले जातात. यात त्यांची पार्श्वभूमी, गुन्हेगारी वृत्ती तपासली जात नाही. परिणामी, अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगार, नशेखोर, अंमली पदार्थांचे तस्कर रिक्षा व्यवसायात उतरले. अल्पवयीन विद्यार्थ्यांची छेड काढणारा रिक्षाचालक देखील गुन्हेगार प्रवृत्तीचा असल्याचे समोर आले होते. त्यामुळे आता परवानाधारकानेच रिक्षा चालवायची, चालक दुसरा आढळल्यास रिक्षा जप्त केली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

हे नियम पाळा, अन्यथा कारवाई अटळ- प्रवाशांना हात पकडून बसण्यासाठी हट्ट करायचा नाही.- महिला, तरुणी दिसल्यावर गाणे, अश्लील इशारे करताना आढळल्यास थेट विनयभंगाचा गुन्हा.- रिक्षाची उजवी बाजू बंद ठेवावी.- रस्त्याच्या मध्येच रिक्षा उभी करू नये. सुरक्षित ठिकाणी प्रवाशांची चढ-उतार करावी.- पाठीमागे प्रवासी बसवू नये. ते कायमचे बंद करा.- नंबरप्लेट, बिल्ला क्रमांकात खाडाखाेड करू नका.

आरटीओ, मनपासोबत बैठकबैठकीत रिक्षाचालकांनी पार्किंग व निश्चित दराविषयी समस्या मांडली. त्यावर आरटीओ व मनपाची लवकरच संयुक्त बैठक आयोजित करून अडचणी सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस