शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

केरळचा औषधी पुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 00:19 IST

केरळमधील पूरस्थितीमुळे तेथील वाहतूक ठप्प झाली असून, त्याचा औरंगाबादेतील औषधी उत्पादक कंपन्यांना मोठा फटका बसत आहे. येथून दररोज २५ ते ३० ट्रक औषधी केरळमध्ये विक्रीसाठी जात असे. मागील आठ दिवसांपासून एकही ट्रक केरळला रवाना झाला नाही.

ठळक मुद्देदररोज जाणारे ३० ट्रक थांबले : टायर, ट्यूबसाठी लागणारे रबर, मसाल्याची आवक घटली

प्रशांत तेलवाडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : केरळमधील पूरस्थितीमुळे तेथील वाहतूक ठप्प झाली असून, त्याचा औरंगाबादेतील औषधी उत्पादक कंपन्यांना मोठा फटका बसत आहे. येथून दररोज २५ ते ३० ट्रक औषधी केरळमध्ये विक्रीसाठी जात असे. मागील आठ दिवसांपासून एकही ट्रक केरळला रवाना झाला नाही. तसेच कंडोम व टायर, ट्यूब बनविण्यासाठी लागणारे रबर आणि मसाल्याच्या आवकवरही परिणाम झाला आहे.मुसळधार पावसामुळे केरळमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. भूस्खलन आणि दरडी कोसळल्याचा परिणाम येथील औद्योगिक वसाहतीलाही जाणवू लागला आहे. येथील औषधी कंपन्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. औरंगाबादमध्ये औषधींच्या ५ ते ७ मोठ्या कंपन्या आहेत. तर ५० ते ७० च्या आसपास मध्यम व लहान प्रकारातील औषध निर्मिती युनिट आहेत. औषधी उत्पादक उद्योजक कमांडर अनिल सावे यांनी सांगितले की, वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांची मिळून दररोज २५ ते ३० ट्रक औषधी केरळ राज्यात जाते. मात्र, मागील आठ दिवसांपासून एकही ट्रक केरळकडे रवाना झाली नाही. याचा आर्थिक फटका औषधी कंपन्यांना बसत आहे. ही औषधी दुसऱ्या राज्यांकडे वळविण्यात येत आहे. जे. के. अ‍ॅन्सेल कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक बी. डी. भूमकर यांनी सांगितले की, केरळ, कर्नाटक व तामिळनाडूमधून रबर येथे येते. त्यातील ८० टक्के रबरची निर्मिती एकट्या केरळात होते. महिनाभरात सुमारे १५ ट्रक लॅटेक्स रबर येथील औद्योेगिक वसाहतीत मागविले जाते. केरळमधून रबर येत नसले तरी कर्नाटक व तामिळनाडूचा पर्याय आहे. पण केरळच्या परिस्थितीचा रबरच्या आवकवर परिणाम निश्चित जाणवेल. टायर व ट्यूब बनविण्यासाठीही केरळ राज्यातून रबर मोठ्या प्रमाणात शहरात आणले जाते. कंपनीतील एका अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार महिनभरात १०० टनपेक्षा अधिक रबर केरळातून येत असते. टायर मोल्डिंगसाठीही या रबराचाच वापर होतो. माल वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष फय्याज खान म्हणाले की, औषधी व इतर उत्पादने घेऊन येथून दररोज ७० ते ८० ट्रक केरळला जात असतात. मात्र, अतिवृष्टीमुळे एकही ट्रक केरळात गेला नाही.इलायची, काळीमिरी, जायफळ, सुंठ, सुपारी महागलीइलायची, काळीमिरी, जायफळ, गोटा खोबरा, सुपारी उत्पादनात केरळ राज्य अग्रेसर आहे. यासंदर्भात मसाल्याचे व्यापारी शिवनारायण तोतला यांनी सांगितले की, इलायचीचा नवीन हंगाम सध्या सुरू आहे. मात्र, अतिवृष्टीने आवक थांबली असून, तेथील उत्पादनाचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, ५०० रुपयांनी इलायची महागली असून शुक्रवारी १५५० ते २००० रुपये प्रतिकिलोने विक्री झाली. ३० ते ४० रुपयांनी काळीमिरीचे भाव वाढून ५५० ते ७०० रुपये किलो झाले.जायपत्री १०० रुपयांनी वधारून १२०० ते १६०० रुपये किलो, सुंठमध्ये ४० रुपये वाढून २४० ते ३०० रुपये किलो तर किलोमागे १० ते २० रुपये वाढून सुपारी ३०० ते ३६० रुपयांना विकत आहे. खोबरा गोटा कर्नाटक, तामिळनाडूतूनही येत असल्याने खोबºयात भाववाढ झाली नाही. तसेच २० ते ३० टक्के चहापत्तीही केरळातून येते, पण आसाममधूनही चहापत्ती येत असल्याने परिणाम नाही.

टॅग्स :medicineऔषधंAurangabadऔरंगाबादKeralaकेरळ