मोबाईल नेटवर्क नसल्याने केळगावकर त्रस्त
By | Updated: December 4, 2020 04:07 IST2020-12-04T04:07:45+5:302020-12-04T04:07:45+5:30
केळगाव हे बाजारपेठेचे गाव असून परिसरातील सहा ते सात गावांचा येथे वावर असतो. अशा परिस्थितीतच गेल्या महिनाभरापासून येथे मोबाईल ...

मोबाईल नेटवर्क नसल्याने केळगावकर त्रस्त
केळगाव हे बाजारपेठेचे गाव असून परिसरातील सहा ते सात गावांचा येथे वावर असतो. अशा परिस्थितीतच गेल्या महिनाभरापासून येथे मोबाईल रेंजची मोठी समस्या जाणवत आहेत. परिसरात सर्वच मोबाईल कंपन्यांचे टॉवर असून या सर्वच कंपन्यांच्या मोबाईल रेंजमध्ये समस्या निर्माण झाल्या आहेत. जवळपास सर्व नागरिकांकडे स्मार्टफोन आहेत. महागडे रिचार्ज करुनही रेंज नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मोबाईल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.