केळगाव ते कोल्हाळा तांडा रस्त्याचे काम नित्कृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:05 IST2021-06-18T04:05:06+5:302021-06-18T04:05:06+5:30

केळगाव ते कोल्हाळा या दोन किलोमीटर रस्त्यापैकी एक किलोमीटरचे काम चार महिन्यांपूर्वी करण्यात आले. उर्वरित एक किलोमीटरचे काम रखडले ...

Kelgaon to Kolhala Tanda road work is excellent | केळगाव ते कोल्हाळा तांडा रस्त्याचे काम नित्कृष्ट

केळगाव ते कोल्हाळा तांडा रस्त्याचे काम नित्कृष्ट

केळगाव ते कोल्हाळा या दोन किलोमीटर रस्त्यापैकी एक किलोमीटरचे काम चार महिन्यांपूर्वी करण्यात आले. उर्वरित एक किलोमीटरचे काम रखडले आहे. जि. प. बांधकाम विभागामार्फत ३०:५४ या योजनेअंतर्गत कामे चालू आहेत. हे काम अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे होत असल्याने खडी फोडून न टाकता मोठेमोठे डबर टाकून डांबरीकरण करण्यात आले. पहिल्याच पावसाने डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर गवत उगवू लागले आहे. रस्त्याच्या बाजूने साईड नाली व पंखे भरण्यात आलेले नाही. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर चार महिन्यांपूर्वी रस्ता तयार झाला, तोही नित्कृष्ट दर्जाचा झाल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप संभाजी बिग्रेडने केला आहे. या कामाची वरिष्ठ पातळीवरून तातडीने चौकशी करावी व कामाच्या गुणवत्तेची गुण नियंत्रण विभागामार्फत तपासणी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.

170621\img_20210604_110241_633_1.jpg

केळगाव ते कोल्हाळा रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी

Web Title: Kelgaon to Kolhala Tanda road work is excellent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.